रेतीची चाेरटी वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:52+5:302021-06-03T04:07:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : जुनी कामठी पाेलिसांनी तारानगर खैरी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी चाेरटी वाहतूक करणारे पिकअप ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : जुनी कामठी पाेलिसांनी तारानगर खैरी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी चाेरटी वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. यात वाहन चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ४ लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.१) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
हेमराज माणिकराम नेताम (२०, रा.बिना संगम, ता.कामठी) असे अटकेतील वाहन चालकाचे नाव आहे. जुनी कामठी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना कन्हान नदी बिना संगम रेतीघाटावरून विनाराॅयल्टी रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्याआधारे पाेलिसांनी तारानगर खैरी शिवारात पाहणी केली. यात त्यांनी एमएच-४०/बीएल-८५५० क्रमांकाचे बाेलेराे पिकअप वाहन थांबवून झडती घेतली. वाहनातील रेती विनाराॅयल्टी असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी चालकासह रेती व पिकअप वाहन ताब्यात घेतले. ती रेती कन्हान नदी बिना संगम रेतीघाटातून आणली असल्याचे वाहन चालकाने पाेलिसांना सांगितले. या कारवाईमध्ये ४ लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
या प्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी आराेपी वाहन चालकाविरुद्ध भादंवि कलम ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, त्यास अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनात प्रशांत सलाम, विजय सिन्हा, अंकुश गजभिये, विवेक श्रीपाद, ईशांत कांबळे यांच्या पथकाने केली.
===Photopath===
020621\img_20210602_185054.jpg
===Caption===
रेती चोरी ची कामगिरी बजावणारे जुनी कामठी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक