लॉकडाऊनमध्येही रोज पोहोचताहेत चार्टर विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:08 AM2021-05-11T04:08:53+5:302021-05-11T04:08:53+5:30

वसीम कुरेशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज जवळपास ...

Charter flights also arrive daily at Lockdown | लॉकडाऊनमध्येही रोज पोहोचताहेत चार्टर विमान

लॉकडाऊनमध्येही रोज पोहोचताहेत चार्टर विमान

Next

वसीम कुरेशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज जवळपास दोन चार्टर विमाने उतरत आहेत. यातील इंधनासाठी उतरणारी विमाने अधिक असतात. दीड ते २ हजार किलोमीटर अंतराचा पल्ला गाठणाऱ्या विमानांमध्ये ८०० किलोमीटर अंतरापर्यंतचेच इंधन भरले जाते. यामुळे या विमानांना नागपूर विमानतळावर उतरावे लागत आहे.

नागपुरात उतरणाऱ्या या लहान विमानांमध्ये अर्धीअधिक प्रवाशांना घेऊन जाणारी चार्टर विमानेच असतात, तर ५० टक्के एअर अँब्युलन्स विमाने असतात. अलीकडेच पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून रवाना झालेल्या एका विमानाचे चाक नागपूर विमानतळावर निखळून पडले होते. या सी-९० विमानाचे मुंबईमध्ये अत्यंत यशस्वीपणे लॅंडिंग करण्यात आले होते. या विमानातही नागपुरात इंधन भरण्यात आले होते. चाक निखळल्याने आपत्‌काळात लॅंडिंग करण्याच्या परवानगीसाठी सुमारे दोन तास विमानाला आकाशात घिरट्या घालत राहावे लागले होते. या विमानात पुरेसे इंधन असल्यानेच हे शक्य झाले. अन्यथा दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

हे विमान लहान असल्याने त्याच्या क्षमतेनुसार, प्रवासी किंवा पार्सल सामान मर्यादित प्रमाणातच भरले जाते. या विमानांना लॅंडिंगसाठी शुल्क लागत नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, दिल्ली, गुजरात, काेलकाता व हैदराबाद किंवा चेन्नई यादरम्यान प्रवास करताना नागपूरहूनच जावे लागते. नागपुरात शेड्यूल फ्लाईट कमी असल्याने येथे अधिक वेळपर्यंत रन-वे रिकामा मिळतो.

लहान विमानांच्या माध्यमातून बिझिनेस जेट्सकडून विमानतळ व्यवस्थापनाला उत्पन्न मिळते. मात्र इंधन भरण्यासाठी ये-जा करणाऱ्या विमानांच्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष रूपाने अत्यंत कमी उत्पन्न मिळते. असे विमान उतरल्यावर त्यांना ग्राऊंड हँडलिंग एजन्सी सेवा देतात. संबंधित चार्टर फ्लाईटशी संलग्नित असलेल्या कंपनीकडून ग्राऊंड हँडलिंग एजन्सीला मिळणाऱ्या उत्पन्नातील एक लहान हिस्सा रॉयल्टीच्या स्वरूपात विमानतळ व्यवस्थापनाला मिळतो.

Web Title: Charter flights also arrive daily at Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.