पाठलाग करून मोबाईल चोरट्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:21+5:302021-03-05T04:08:21+5:30

नागपूर : लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांचे मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पाठलाग करून अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ...

Chased and caught mobile thieves | पाठलाग करून मोबाईल चोरट्यांना पकडले

पाठलाग करून मोबाईल चोरट्यांना पकडले

Next

नागपूर : लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांचे मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पाठलाग करून अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री १२.३० वाजता कोलकाता मार्गावर करण्यात आली.

तौफिक शेख उर्फ हिरा सोनू (३०) आणि त्याचा साथीदार मो. इम्तियाज ऊर्फ नव्वा (२५) दोन्ही रा. अंसारनगर, मोमिनपुरा अशी अटकेतील मोबाईल चोरांची नावे आहेत. तौफिक हा टोळीचा सूत्रधार आहे. कोलकाता आणि मुंबई मार्गावर आऊटरकडील भागात रेल्वेगाडीचा वेग कमी असतो. यावेळी प्रवासी मोबाईलवर कुटुंबीयांशी संवाद साधतात. ही संधी साधून या टोळीतील सदस्य प्रवाशांचे मोबाईल हिसकतात. अलिकडेच नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या बी-१ आणि एस-३ डब्यातील प्रवाशांचे महागडे मोबाईल या टोळीने हिसकावले होते. या घटनेमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली होती. या टोळीतील आरोपीने दोन्ही मोबाईल मोमिनपुऱ्यात विकले. विकणारा आणि खरेदी करणाराऱ्यांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. मात्र, या टोळीचा सुत्रधार तौफिक हा फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस शिपाई योगेश घुरडे, शैलेश उके, पप्पू मिश्रा, प्रवीण खवसे, चंद्रशेखर मदनकर आणि रोशन मोगरे यांनी कोलकाता मार्गावर शोध घेतला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जात होते. परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

............

Web Title: Chased and caught mobile thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.