एअर इंडियामध्ये नोकरीच्या नावावर फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:32 AM2018-07-26T01:32:00+5:302018-07-26T01:33:14+5:30

एअर इंडियामध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बहुचर्चित ठगबाज सचिन पांडे याने साडेसात लाख रुपयाची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. सचिन फरार आहे.

Cheating for job in Air India | एअर इंडियामध्ये नोकरीच्या नावावर फसवणूक

एअर इंडियामध्ये नोकरीच्या नावावर फसवणूक

Next
ठळक मुद्देठगबाज सचिन पांडे याचे कृत्य : सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर इंडियामध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बहुचर्चित ठगबाज सचिन पांडे याने साडेसात लाख रुपयाची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. सचिन फरार आहे.
ठगबाज पांडेने आतापर्यंत उद्योजकासह अनेकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. त्याच्याविरुद्ध धंतोली आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात अटक केल्यानंतर तो अनेक दिवस नागपूरच्या तुरुंगात राहिला होता. तीन वर्षापूर्वी तो तुरुंगातून जामिनावर सुटून आला. काही दिवस भूमिगत राहिल्यानंतर त्याने बैरामजी टाऊन येथे आॅर्गेनिक खाद्य सामग्रीचे दुकान उघडले होते. या दरम्यान तो आशिष वर्मा नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला. आशिषच्या माध्यमातून सचिनची तक्रारकर्ता अमितकुमार गुप्ता रा. फ्रेण्ड्स कॉलनी याच्याशी ओळख झाली.
सचिन पांडेने अमितला त्याचे एअर इंडियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. तसेच सचिनला एअर इंडियात नोकरी लावून देण्याचे आमिषही दिले. यासाठी १५ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्याने अमितला अर्ज देत यात आपल्याबाबतची माहिती भरण्यास सांगितले. यासाठी त्याने २५ जानेवारी रोजी अमितकडून साडेसात लाख रुपये घेतले. त्यानंतर अमित नोकरीची प्रतीक्षा करू लाला. काही दिवसापर्यंत टाळाटाळ केल्यानंतर सचिन फरार झाला. त्याच्या शोध घेत असताना सचिन सराईत ठगबाज असल्याचे त्याच्या लक्षात आले. अमितने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीएसआय एम.बी. चौरसिया यांनी तपासानंतर गुन्हा दाखल केला.

विमान कंपनीचे कार्यालयही उघडले होते
सचिन पांडेने दहा वर्षापूर्वी स्वत:ची एअर लाईन्स सुरू करण्याची घोषणाही केली होती. तो नागपूरवरून तिरुपतीसाठी विमान सेवा सुरु करणार होता. यासाठी त्याने नागपुरात कार्यालयही उघडले होते.

तुरुंगातही होता सक्रिय
सचिनने नागपूरच्या तुरुंगातही आपला दबदबा निर्माण केला होता. अधिकाºयांशी संपर्क असल्याचे सांगून तुरुंगात सुखसोई उपलब्ध करून देण्यासाठी तो कैद्यांकडून तो वसुली करायचा. अमित गुप्तासह अनेकदांना सचिनने फसवले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Cheating for job in Air India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.