भक्त निवास बुकिंगच्या नावावर फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 09:03 PM2019-05-31T21:03:34+5:302019-05-31T21:04:13+5:30

भक्तनिवासच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावावर एका व्यक्तीची १ लाख ७ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील असून याप्रकरणी सदर पोलिसांनी सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

Cheating on the name of booking accommodation of the devotee | भक्त निवास बुकिंगच्या नावावर फसवणूक

भक्त निवास बुकिंगच्या नावावर फसवणूक

Next
ठळक मुद्देसहा महिन्यानंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भक्तनिवासच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावावर एका व्यक्तीची १ लाख ७ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील असून याप्रकरणी सदर पोलिसांनी सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
श्याम रेवाराम रघुते (४८) रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, नंदनवन हे सिव्हील लाईन्स परिसरातील जीएसटी कार्यालयात नोकरीवर आहेत. ते कुटुंबासह कोकण पर्यटनाला जाणार होते. त्याची तयारी सुरूहोती. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी कार्यालयात असताना त्यांनी मोबाईलवरून भक्तनिवास बुक करण्याकरिता मंगल रिसर्चवर माहिती सर्च केली. त्यात ०६२९००७७३४४ व ३२२३०४००४० हा नंबर मिळाला. त्यावर फिर्यादीने संपर्क साधला असता आरोपीने सांगितले की, ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स पेमेंट करावे लागेल. यासाठी आरोपीने आपल्या मोबाईलवरून एक लिंक पाठवली आणि ही लिंक ९२२३०४००४० या क्रमांकावर पाठवण्यास सांगितले. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या डेबिट कार्डची डिटेल माहिती भरून दिली. आरोपींनी ओटीपी नंबर मागितला. रघुते यांनी तो सुद्धा दिला. काही दिवसानंतर रघुते यांच्या आंध्रा बँकच्या अकाऊंटमधून २५,७०० रुपये व एक्सिस बँकेच्या अकाऊंटमधून १८,९०० रुपये डेबिट झाले. त्याचा मॅसेजसुद्धा आला. तेव्हा त्यांना संशय आला. पैसे परस्पर कसे निघाले याची माहिती काढत असतानाच ३१ ऑक्टोबर रोजी पुन्हा त्यांच्या खात्यातून ६२,४०० रुपये व्हीआयपी अ‍ॅपद्वारे ट्रान्सफर झाले. तेव्हा मात्र त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. सायबर सेलने आपल्या पातळीवर चौकशी केली. तेव्हा ऑनलाईन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. सदर पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cheating on the name of booking accommodation of the devotee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.