मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:37 AM2019-03-26T01:37:17+5:302019-03-26T01:38:07+5:30

छतावर मोबाईल टॉवर लावण्याची परवानगी दिल्यास कुटुंबातील दोघांना ३० हजार रुपये महिन्याची नोकरी आणि प्रति महिना ८० हजार रुपये भाडे देण्याची थाप मारून दोघांनी एका वृद्धाला ८ लाख, ६४ हजारांचा गंडा घातला. तब्बल पाच महिने आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या नावाने रक्कम जमा केल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे वृद्धाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

Cheating in the name of mobile tower project | मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाखाली फसवणूक

मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाखाली फसवणूक

Next
ठळक मुद्देदोघांना नोकरी, महिन्याला ८० हजार भाडे देण्याची थाप : वृद्धाकडून ८.६४ लाख हडपले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छतावर मोबाईल टॉवर लावण्याची परवानगी दिल्यास कुटुंबातील दोघांना ३० हजार रुपये महिन्याची नोकरी आणि प्रति महिना ८० हजार रुपये भाडे देण्याची थाप मारून दोघांनी एका वृद्धाला ८ लाख, ६४ हजारांचा गंडा घातला. तब्बल पाच महिने आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या नावाने रक्कम जमा केल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे वृद्धाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
भीमराव दुर्गाजी बागडे (वय ६२) असे फिर्यादीचे नाव आहे. ते जरीपटक्यातील आर्यनगरात राहतात. त्यांना ३० ऑगस्ट २०१८ ला ७९७९००१२०८ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. स्वत:चे नाव शशांक मिश्रा सांगणाऱ्या या आरोपीने आपण जियो रिलायन्स कंपनीचे मॅनेजर असल्याचे सांगितले. तुमच्या इमारतीच्या स्लॅबवर रिलायन्सचा टॉवर उभारण्याची परवानगी दिल्यास तुम्ही म्हणाल त्या दोघांना ३० हजार रुपये महिन्याची नोकरी दिली जाईल आणि दर महिन्याला टॉवरचे ८० हजार रुपये भाडे दिले जाईल, असे मिश्राने बागडेंना सांगितले. त्याच्या थापेबाजीवर विश्वास ठेवून बागडेंनी मिश्राला आपली परवानगी असल्याचे सांगितले. त्यानंतर मिश्रा तसेच ७६३१४१५१२० तसेच ९७०८४३४३३५ या मोबाईल नंबरवरून बोलणाऱ्या आरोपीने ३० ऑगस्ट २०१८ ते २२ जानेवारी २०१९ या कालावधीत स्वत:च्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने ८ लाख, ६४ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. एवढी रक्कम जमा केल्यानंतरही आरोपी कोणते ना कोणते कारण सांगून बागडेंना रक्कम मागत होते. ते फसवणूक करीत असल्याची शंका आल्याने बागडेंनी आपली रक्कम त्यांना परत मागितली. रक्कम परत पाहिजे असेल तर पुन्हा तुम्हाला रक्कम जमा करावी लागेल, असे म्हणत आरोपींनी बागडेंना पुन्हा त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानंतरही त्यांची बनवाबनवी सुरूच राहिल्याने बागडेंनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. जरीपटका पोलिसांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आरोपी शशांक मिश्रा तसेच त्याच्या साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Cheating in the name of mobile tower project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.