नागपुरात  रामबाण औषधाच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:24 AM2018-07-14T01:24:22+5:302018-07-14T01:26:26+5:30

दिव्यांग तसेच विविध व्याधीग्रस्त रुग्णाला रामबाण औषध देऊन पूर्ण बरे करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये हडपणाऱ्या टोळीविरुद्ध तहसील पोलिसांकडेही एका पीडिताने तक्रार नोंदवली. चारुलेश शालिकराम टेंभूर्णे असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. ते उदय हायस्कूल भानखेडा येथे राहतात.

Cheating in the name of Ramaban medicine in Nagpur | नागपुरात  रामबाण औषधाच्या नावाखाली फसवणूक

नागपुरात  रामबाण औषधाच्या नावाखाली फसवणूक

Next
ठळक मुद्देभस्म देणाऱ्या टोळीवर आणखी एक गुन्हा : पुन्हा गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिव्यांग तसेच विविध व्याधीग्रस्त रुग्णाला रामबाण औषध देऊन पूर्ण बरे करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये हडपणाऱ्या टोळीविरुद्ध तहसील पोलिसांकडेही एका पीडिताने तक्रार नोंदवली. चारुलेश शालिकराम टेंभूर्णे असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. ते उदय हायस्कूल भानखेडा येथे राहतात.
टेंभूर्णे यांच्या बहिणीला अस्थमाचा आजार होता. तो पूर्णपणे बरा करून देतो, अशी थाप मारून आरोपी राजू ठाकूर (वय २४, रा. अमरावती), नरेश शिंदे (वय ३०) आणि बालाजी आयुर्वेदिक औषधालयाचा मालक सुनील सायवान (बैद्यनाथ चौक) या तिघांनी टेंभूर्णे यांच्याकडून २४ मे ते १० जुलै या कालावधीत ४ लाख, ५० हजारांची रक्कम हडपली. दोन महिन्यांपर्यंत औषध घेऊनही टेंभूर्णे यांच्या बहिणीला कवडीचा फायदा झाला नाही.
दरम्यान, अशाच प्रकारे या टोळीने भारत पंजाबराव अढाव (वय ४९) यांचीही फसवणूक केली. अढाव यांचा आठ वर्षीय मुलगा दिव्यांग आहे. महिनाभराच्या उपचारात तुमच्या मुलाला पूर्णपणे ठीक करून देतो, असा दावा करून आरोपी राजू ठाकूर (वय २४, रा. अमरावती), मनोज जाधव (वय २५), विजय जाधव (वय २४) आणि बालाजी आयुर्वेदिक औषधालयाचा मालक सुनील सायवान (बैद्यनाथ चौक) या चौघांनी करून अढाव यांच्याकडून १ लाख ७२ हजार ४०० रुपये हडपले होते.
लोकमतमुळे पीडिताला माहिती
लोकमतने हे वृत्त प्रकाशित करताच या टोळीने गंडविलेल्यांपैकी टेंभूर्णे यांना फसवणुकीची जाणीव झाली. त्यामुळे टेंभूर्णे यांनी तहसील पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध १० जुलैला गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांचा तपास संपल्यानंतर तहसील पोलीस या टोळीतील आरोपींना अटक करतील. आणखी या टोळीने किती लोकांना गंडविले, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: Cheating in the name of Ramaban medicine in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.