‘इव्हेंट शो’ मध्ये पार्टनरशीपचे आमिष दाखवून महिलेने लावला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:45 AM2019-05-13T11:45:16+5:302019-05-13T11:47:02+5:30

उपराजधानीसह इतर अनेक शहरांमध्ये लहान-मोठे इव्हेंट प्रोग्राम करणाऱ्या युवकांना पार्टनरशिपचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाºया महिलेचे हळूहळू अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.

Cheating by woman in the name of show | ‘इव्हेंट शो’ मध्ये पार्टनरशीपचे आमिष दाखवून महिलेने लावला चुना

‘इव्हेंट शो’ मध्ये पार्टनरशीपचे आमिष दाखवून महिलेने लावला चुना

Next
ठळक मुद्देआरोपी महिलांनी अनेकांना फसविले पैसे परत मागितल्यास पोलिसात तक्रार किंवा गुंडांकडून मिळते धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीसह इतर अनेक शहरांमध्ये लहान-मोठे इव्हेंट प्रोग्राम करणाऱ्या युवकांना पार्टनरशिपचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाºया महिलेचे हळूहळू अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. निधी असे आरोपी महिलेचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिसांनीसुद्धा तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिने एका तरुणीला ७५ हजाराने फसवल्याचा आरोप आहे. अगोदर फसवणूक केली आणि नंतर पैसे परत मागितले असता गुंडांकडून धमकावल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी २९ वर्षीय युवती एमआयडीसी परिसरातील निर्जन परिसरातून आरोपी महिलांनी पाठवलेल्या गुंडांच्या तावडीतून सुखरुप पळून जाण्यात यशस्वी ठरली. आरोपी महिला निशी (४५) ही सिव्हील लाईन्स येथील एका महागड्या अपार्टमेंटमध्ये राहते. पीडितेचा आरोप आहे की, महिलेने अनेकांची फसवणूक केल्यानंतरही पोलीस तिच्याविरुद्ध कुठलीही कठोर कारवाई करीत नसल्याने ती सर्रासपणे आपले काम करीत आहे. शहरात होणारे इव्हेंट, चॅरिटी शोमध्ये निधी जाते. तेथूनच इव्हेेंट आॅर्गनायजर आणि शो मध्ये काम करणाºया युवक-युवतींना फिफ्टी-फिफ्टीची पार्टनरशिप देण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढते.
फिर्यादी युवती नगमा (बदललेले नाव) आॅगस्ट २०१८ मध्ये व्हीआर ग्रुपकडून रेशीमबाग येथे आयोजित एका चॅरिटी शोमध्ये काम करीत होती. त्या दरम्यान तिची निधीसोबत ओळख झाली. निधीने तिला इव्हेंट शो आयोजित करणे आणि लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट पॅकेजिंगची आॅर्डर असल्याचे सांगितले. यासाठी फिफ्टी-फिफ्टी पार्टनरशिपमध्ये काम करण्याचे आमिष दाखविले. जानेवारी २०१९ मध्ये नगमाला नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथील लॉनमध्ये लग्नात गिफ्ट पॅकेजिंगचे दीड लाख रुपयाच्या कामाचे आॅर्डर मिळाले. यासंबंधात निधीशी संपर्क साधल्यास तिने नगमाला फिफ्टी-फिफ्टी पैसे लावण्याचे आमिष दाखवले. निधीने अगोदरच नगमाला गिफ्ट आणि पॅकेजिंगसाठी ७५ हजार रुपये मागितले होते. परंतु लग्नाच्या दिवशी निधी गिफ्ट घेऊन आलीच नाही.
ती नगमाचे फोनही उचलत नव्हती. अखेर ६ मे रोजी निधीने फोन उचलला. नगमाने आपले ७५ हजार रुपये परत मागितले, तेव्हा निधीने तिला एमआयडीसीच्या महानंदा दूध डेअरीजवळ सायंकाळी ६.३० वाजता बोलावले. तिथे सायंकाळी ६.४५ वाजता एक पांढºया रंगाच्या कारमध्ये दोन जण आले. त्यांनी नगमाला कारमध्ये बसून निधीकडे चलण्यास सांगितले परंतु नगमाला संशय आल्याने ती आरोपीला झटका देऊन तेथून पळाली. तिच्या तक्रारीवर आरोपी महिला व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शिवीगाळ करून मारहाण
फिर्यादी युवतीजवळ कारने आलेल्या लोकांनी नगमाला निधीला पैसे का मागितले म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. यानंतर पुन्हा पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पिस्तुलच्या धाकावर लुटमार
गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत राजभवनसमोर २८ फेब्रुवारी रोजी २५ वर्षीय इव्हेंट आॅर्गनायजर विजय जादोन याला पिस्तुलच्या धाकावर आरोपी निधीच्या तीन गुंडांनी धमकावत लुटले होते. विजयनुसार त्याने निधीसोबत पार्टनरशिपमध्ये एक इव्हेंट शो आयोजित केला होता. त्याच्या आॅनलाईन तिकिटांचे सर्व पैसे निधीने आपल्याजवळच ठेवले होते. तिने कलावंत आणि समानाचे जवळपास २२ लाख रुपये ३० डिसेंबरला देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे देण्यास टाळाटाळ करीत राहिली. याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यामुळे निधीने आपल्या गुंडांकडून त्याला धमकावत लुटले होते.

Web Title: Cheating by woman in the name of show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.