एजी, बीव्हीजीच्या शपथपत्रांची तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:14+5:302021-06-19T04:07:14+5:30
- ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पार पडली तपास समितीची बैठक लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचरा संकलन व्यवस्थेला प्रभावी बनविण्यसाठी मनपाने ...
- ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पार पडली तपास समितीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचरा संकलन व्यवस्थेला प्रभावी बनविण्यसाठी मनपाने दोन कंपन्या एजी एन्वायरो आणि बीव्हीजीची नियुक्ती केली. परंतु, कचरा संकलनासंदर्भातील व्यवस्थापनाबद्दल तक्रारी पुढे येत आहेत. तक्रारींना लक्षात घेऊन मनपा सदनाने सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत समितीचे गठन केले. समितीची दुसरी बैठक शुक्रवारी पार पडली. यात दोन्ही कंपन्यांकडून सादर करण्यात आलेल्या शपथपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले.
शुक्रवारी मनपा मुख्यालयात दोन्ही कंपन्यांच्या पक्षाकडून माहिती घेण्यात आली. यावेळी आरोग्य समिती सभापती महेश महाजन, नगरसेवक नितीन साठवणे, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते. कंपनीकडून कर्मचाऱ्यांची संख्या, कचरा गाडी, लहान गाडी, जेसीबी, टिप्पर, कॉम्पेक्टर, रिक्षा आदींची माहिती शपथपत्रात देण्यात आली. त्या शपथपत्रांचे तपास करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
फोटो ओळी :- बैठकीत उपस्थितांशी चर्चा करताना अविनाश ठाकरे, महेश महाजन, संजय निपाणे व अन्य
............