छटव्रती महिला अर्पण करणार अस्ताचल सूर्याला अर्घ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:08 AM2018-11-13T01:08:41+5:302018-11-13T01:12:19+5:30
सूर्य उपासनेचे महापर्व म्हणून उत्तर भारतात छटपूजेला मान्यता आहे. मंगळवारी छटव्रत स्वीकारलेल्या महिला अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमन करतील. गव्हाची कणिक, तूप, गूळ, सुक्या मेव्याद्वारे बनविलेले ठेकुवा आणि फळे सुपात ठेवून सूर्यदेवाचे पूजन केले जाईल. यानंतर रात्रभर छट पर्वाची गाणी गाऊन आराधना केली जाईल. यानंतर शुक्रवारी सकाळी सूर्याला पुन्हा अर्घ्य अर्पण करून निर्जल उपवास सोडण्यात येईल. सोमवारी छटव्रती महिलांनी खरना व्रत पाळले. दिवसभर उपवास ठेवून सायंकाळी खीरपोळीचा प्रसाद ग्रहण केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सूर्य उपासनेचे महापर्व म्हणून उत्तर भारतात छटपूजेला मान्यता आहे. मंगळवारी छटव्रत स्वीकारलेल्या महिला अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमन करतील. गव्हाची कणिक, तूप, गूळ, सुक्या मेव्याद्वारे बनविलेले ठेकुवा आणि फळे सुपात ठेवून सूर्यदेवाचे पूजन केले जाईल. यानंतर रात्रभर छट पर्वाची गाणी गाऊन आराधना केली जाईल. यानंतर शुक्रवारी सकाळी सूर्याला पुन्हा अर्घ्य अर्पण करून निर्जल उपवास सोडण्यात येईल. सोमवारी छटव्रती महिलांनी खरना व्रत पाळले. दिवसभर उपवास ठेवून सायंकाळी खीरपोळीचा प्रसाद ग्रहण केला.
दरम्यान छटपूजा पर्वाचे औचित्य साधून शहरातील तलावांवरील घाटांवर छटपूजेची तयारी पूर्ण करण्यात आली. अंबाझरी तलावाच्या विविध भागात पूजाघाट तयार करण्यात आले आहेत. घाटाच्या आसपास चेंजिंग रुमची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडस् आणि ट्यूबची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका व शहरातील विविध छटपूजा समित्यांद्वारे पायऱ्
उत्तर भारतीय सभा
उत्तर भारतीय सभेचे विदर्भ अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री आणि जिल्हाध्यक्ष रामप्रताप शुक्ला यांनी सांगितले की, घाटावर छटव्रत पाळणाऱ्या महिलांचे पुष्पवर्षा करून स्वागत करण्यात येईल. सभेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी घाटांवर पूजेसाठी आवश्यक काम पूर्ण केले. अंबाझरी तलावात लोखंडाचे पाट लावण्यात आले आहेत व हे क्षेत्र बांबूद्वारे सुरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तलावांवर पदाधिकारी सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले. अंबाझरी घाटाची व्यवस्था विवेक पांडेय, दिनेश सिंह, कृपाशंकर गुप्ता, संतोष भगत, ठाकूर विजय सिंह, ओ. पी. तिवारी, रजनीश दुबे, भोला साहू, एस. एन. पांडेय, चंद्रकुमार साहू, अम्बरिश दुबे, सुभाष उपाध्याय, इंद्रसेन सिंह, आशिष दुबे, टी. पी. तिवारी, रामअवतार सिंह, शेषनाथ पांडेय, अम्बरिश शर्मा आदींनी सांभाळली आहे.
राष्ट्रीय छट पूजा समिती
राष्ट्रीय छट पूजा समितीच्यावतीने अंबाझरी तलावावर छटपूजेची तयारी करण्यात आली आहे. पूजास्थळी रंगरंगोटीचे काम समितीच्यावतीने करण्यात आल्याचे संयोजक विवेक शर्मा यांनी सांगितले. भाविकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवस्थेत समिती अध्यक्ष रतन कुमार बरुआ, विजय तिवारी, मनोज सिंह, अमरेंद्र राय, डॉ. गौतम प्रसाद, संजीव सिंह, सुनील शर्मा, पंकज पांडे, जयभगवान शर्मा आदींचा सहभाग आहे.