मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:20 AM2017-11-11T01:20:31+5:302017-11-11T01:23:46+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Chief Minister Devendra Fadnavis got Vidarbha Gaurav Award | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ गौरव पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ गौरव पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
फडणवीस यांनी पक्षबांधणीच्या कामापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक, महापौर व आमदार असताना आपले कर्तृत्व सिद्ध केले. सध्या ते मुख्यमंत्री म्हणून गौरवास्पद कार्य करीत आहेत. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. विदर्भाच्या विकासाकरिता भरीव योगदान देणाºया किंवा राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढविणाºया व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड केली जाते.
यापूर्वी नितीन गडकरी, डॉ. विजय भटकर, ए. बी. बर्धन, कवी ग्रेस, डॉ. जी. एम. टावरी, संजय सुरकर, शिवकिशन अग्रवाल, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. भाऊसाहेब झिटे, पद्मश्री प्रभाकर वैद्य, डॉ. मधुकर वाकोडे, दादाजी खोब्रागडे, डॉ. श्रीधर शनवारे, भीमराव पांचाळे, विजय जावंधिया, विजयराव देशमुख, ए. बी. डोंगरे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गिरीश गांधी यांनी दिली.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis got Vidarbha Gaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.