मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर
By कमलेश वानखेडे | Updated: July 7, 2023 14:19 IST2023-07-07T14:18:33+5:302023-07-07T14:19:23+5:30
कोटगुल रोड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात होणार सहभागी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. एमआयडीसी मैदान, कोटगुल रोड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांचे शनिवारी सकाळी १०.१५ वाजता शासकीय विमानाने मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीसाठी रवाना होतील. सकाळी ११ वाजता एमआयडीसी मैदान, कोटगुल रोड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात सहभागी होत विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ देतील तसेच यंत्रणेला आवश्यक सूचना देतील. दुपारी १.०५ वाजता ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीहून नागपूरसाठी रवाना होतील व दुपारी १.४५ वाजता शासकीय विमानाने नागपूर विमातळावरून मुंबईसाठी रवाना होतील.