मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:05 PM2019-09-09T22:05:50+5:302019-09-09T22:07:54+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

Chief Minister Fadnavis visits various Ganeshotsav mandals | मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट 

मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येत असून, यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ हनुमान मंदिर येथील गणेश उत्सव मंडळ, झेंडा चौक येथील गणेश उत्सव मंडळ, संभाजीनगर येथील राजे संभाजी गणेश उत्सव मंडळ, अध्यापक ले-आऊट येथील श्री गणेश उत्सव मंडळ, दीनदयालनगर येथील नवचेतना गणेश उत्सव मंडळ, भेंडे ले-आऊट येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, एचबी इस्टेट येथील गणेश उत्सव मंडळ, पांडे ले-आऊट येथील गणेश उत्सव मंडळ, प्रतापनगर येथील साहस गणेश उत्सव मंडळ, बजाजनगर येथील गणेश उत्सव मंडळ तसेच धंतोली, वासवी मंदिर येथील तरुण गणेश उत्सव मंडळ येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले.
भेंडे ले-आऊट येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नांदू दे तसेच सर्वांच्या एकोप्याने या उत्सवाचा आनंद द्विगुणित होऊ दे, अशी मागणी श्री गणेशाच्या चरणी केली.
एचबी टाऊन जुना पारडी नाका, संती गणेश उत्सव मंडळ, भारत क्रीडा मंडळ, तुळशीबाग रोड येथील गणपती उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट तसेच कॉटन मार्केट येथील गणेश उत्सव मंडळांना भेट देऊन तेथील श्रीगणेशाचे दर्शनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले.

Web Title: Chief Minister Fadnavis visits various Ganeshotsav mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.