पदवी अभ्यासक्रमाच्या दुप्पटीने जागा वाढतील : मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:20 PM2019-01-04T22:20:00+5:302019-01-04T22:21:17+5:30

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार रुग्णालयामुळे ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ (बीडीएस) या पदवी अभ्यासक्रमाच्या जागा दुप्पटीने वाढतील. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. सोबतच अतिविशेषोपचारामुळे कुशल तज्ज्ञ समाजाला मिळतील, अशी अपेक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

Chief Minister Fadnavis will get double the degree of degree course | पदवी अभ्यासक्रमाच्या दुप्पटीने जागा वाढतील : मुख्यमंत्री फडणवीस

पदवी अभ्यासक्रमाच्या दुप्पटीने जागा वाढतील : मुख्यमंत्री फडणवीस

Next
ठळक मुद्देडेंटलच्या सुवर्ण जयंती इमारत कोनशिलेचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार रुग्णालयामुळे ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ (बीडीएस) या पदवी अभ्यासक्रमाच्या जागा दुप्पटीने वाढतील. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. सोबतच अतिविशेषोपचारामुळे कुशल तज्ज्ञ समाजाला मिळतील, अशी अपेक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) सुवर्ण जयंती इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाबांधणी व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आ. डॉ. मिलिंद माने, आ. परिणय फुके, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, सहसंचालक (डेंटल) डॉ. विवेक पाखमोडे, डॉ. विरल कामदार व अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केवळ देशातच नव्हे तर जगात दंतचिकित्सा क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत. मुखशल्यचिकित्सक आता केवळ दातांच्या आजारापुरतेच मर्यादित राहिले नाही तर ‘कॉस्मेटिक’ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळे दंत महाविद्यालयाच्या श्रेणीवर्धर्नाची गरज होती. ती आता पूर्ण होणार आहे. सोबतीला अतिविशेषोपचार रुग्णालय होणार असल्याने या संस्थेमधून कुशल तज्ज्ञ बाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे. दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या विकासासाठी व यंत्रसामुग्रीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ. गणवीर यांनी मानले. कार्यक्रमाला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. सजल मित्रा, डॉ. दीप्ती जैन, डॉ. ए.झेड. नितनवरे, डॉ. राजेश गोसावी, डॉ. अभय दातारकर, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. रितेश कळसकर, डॉ. वुसंधरा भड, डॉ. अरुण खळीकर, डॉ. सचिन खत्री, डॉ. दर्शन दक्षिणदास आदी उपस्थित होते.
‘ओरल कॅन्सर सेंटर’ अद्यावत होणार
नागपूर शहर हे मुखाच्या कर्करोगाचे ‘कॅपिटल’ होऊ पाहत आहे. या रोगाची जनजागृती, निदान व उपचारासाठी शासकीय दंत रुग्णालयाचा पुढाकार कौतुकास्पद आहे. महाविद्यालयाच्या श्रेणीवर्धनमध्ये ‘ओरल कॅन्सर सेंटर’ही अद्यावत होणार आहे. यामुळे याचा फायदा रुग्णांना होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आठ नवे विभाग -डॉ. मुखर्जी
प्रास्ताविक डॉ. मुखर्जी यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात सुवर्ण जयंती इमारतीचे वैशिष्ट्यांसोबतच अतिविशेषोपचार रुग्णालयात सुरू होणाऱ्या नव्या आठ विभागांची माहिती दिली. ते म्हणाले, नव्या इमारतीत ‘डिपार्टमेंट ऑफ डिजिटल डेन्टीस्ट्री’, ‘डिपार्टमेंट ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजी’, ‘डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटीक डेन्टीस्ट्री’, ‘स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम’, ‘सेंट्रल रिसर्च लेबॉरटरी’, ‘अ‍ॅडव्हान्स ई-लायब्ररी’, ‘व्हर्च्युअल डिजिटल क्लास रुम’ व ‘अ‍ॅडव्हान्स सीम्युलेशन प्री-क्लिनीकल लॅब’ आदी विभाग सुरू करण्यात येतील.

 

Web Title: Chief Minister Fadnavis will get double the degree of degree course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.