मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महावेध’चे आज उद्घाटन
By admin | Published: April 30, 2017 01:37 AM2017-04-30T01:37:38+5:302017-04-30T01:37:38+5:30
महावेध प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डोंगरगाव जि. नागपूर येथे करण्यात येणार आहे.
राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र : डोंगरगाव येथे शेतकरी मेळावा
नागपूर : महावेध प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डोंगरगाव जि. नागपूर येथे करण्यात येणार आहे. यावेळी ‘उन्नत शेती- समृध्द शेतकरी’ मोहिमेंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.
कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.(प्रतिनिधी)