मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:01 AM2017-09-03T01:01:10+5:302017-09-03T01:02:09+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीनगर गणेश मंडळाला भेट दिली. श्री पूजन केले. मंडळातर्फे धातूची मूर्ती स्थापित केली जाते, याचे त्यांनी कौतुक केले. मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या-पुस्तके गोळा करून ते वितरित केले जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वही-पुस्तक गणरायाच्या चरणी अर्पण करून सर्वांना शिक्षण लाभू दे, अशी प्रार्थना केली. मंडळातर्फे राबविण्यात येणाºया सामाजिक उपक्रमांची त्यांनी प्रशंशा केली. यावेळी महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी उपस्थित होते.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरपीएफ बरॅक अजनी येथील रेल्वे सुरक्षा बल गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन दर्शन घेतले. यासोबतच पांडे ले-आऊट येथील उत्कर्ष सांस्कृतिक मंडळ, भेंडे ले-आऊट येथील श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, जयताळा एकात्मतानगर व उज्ज्वल सोसायटी येथील नवयुवक गणेश मंडळ, सरस्वती विहार कॉलनी त्रिमूर्तीनगर येथील सरस्वती विहार गणेशोत्सव मंडळ, प्रतापनगर येथील साहस गणेशोत्सव मंडळ, अभ्यंकरनगर सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, कॉर्पोरेशन कॉलनी गणेश उत्सव मंडळ, रामदासपेठ फार्मलॅण्ड गणेश उत्सव मंडळ, इमामवाडा येथील श्री गणेशोत्सव मंडळ, भगवाननगर येथील युवा गणेशोत्सव मंडळ, नरेंद्रनगर येथील महागणपती, मनीषनगर येथील पॅन्थॉननगर आश्रय उत्सव समिती आदी मंडळांना भेट धेऊन गणरायाचे दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि निरोगी व आनंदी जीवनाची मनोकामना केली.
मुख्यमंत्री ‘बिफोर टाइम’
काही मंडळांना मुख्यमंत्र्यांनी बिफोर टाइम भेट दिली. मुख्यमंत्री येणार म्हणून कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. प्रत्येक जण तयारीला लागले होते. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफा येऊन पोहोचला. वेळेपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस पोहोचल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांना काय करावे, ते सुचेनासे झाले होते.
सेल्फीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह
गणेश मंडळांना भेट दिल्यानंतर मंडळांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढून घेण्यास आग्रही दिसले. मुख्यमंत्र्यांनीही बºयाच ठिकाणी कार्यकर्त्यांचे मन राखत सेल्फी काढून घेतला.
मुख्यमंत्र्यांवरील विघ्न टळो
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले. नागपूरचे पुत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांवर आता कुठलेही विघ्न येऊ देऊ नको, असे साकडे गणेश मंडळांनी गणरायांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घातले.