मुख्यमंत्री स्वबळावर सरकार खेचत आहे; जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:41 PM2018-02-11T14:41:11+5:302018-02-11T14:41:37+5:30

केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

The Chief Minister is pulling the government on its own; Jitendra Awhad | मुख्यमंत्री स्वबळावर सरकार खेचत आहे; जितेंद्र आव्हाड

मुख्यमंत्री स्वबळावर सरकार खेचत आहे; जितेंद्र आव्हाड

Next
ठळक मुद्देपत्रपरिषदेत मांडला सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चौथ्या वर्षातही राज्य सरकारची कामगिरी दिसत नाही. आर्थिक धोरणे सपशेल अपयश ठरलेली आहेत. कर्जमाफीची घोषणा करण्यात आली परंतु शेतकऱ्यांना लाभ झालेला दिसत नाही. प्रकल्पांच्या बाबतही अशीच अवस्था आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव लिटरमागे १० रुपयांनी अधिक आहे. केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारमधील अस्वस्थता विचारात घेता लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका एकत्रित घेणार नाही. दोन्ही निवडणुका एकत्रित घेतल्यातर लोकसभेच्याही जागा कमी होतील अशी भाजपा नेत्यांना भिती आहे. या देशात जेव्हाजेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. तेव्हातेव्हा मतदारांनी सत्ता बदल घडविला.. देशात अशीच परिस्थिती आहे. पुरोगामी विचाराचे राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भाजपा सारख्या जातीयवादी पक्षासोबत कधीही जाणार नाही. आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठी पवार यांच्यावर आरोप केले जातात. गोपीनाथ मुुंडे, गो.रा. खैरनार यांनी असेच आरोप केले होते. आता डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. वास्तविक भिमा कोरेगाव घटना घडताच हे मनुवाद्यांचे षडयंत्र असल्याचे पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.
संभाजी भिडे तरुणांची डोकी भडकावण्याचे काम करतात. फुले, शाहू व आंबेडकरांवर ते कधी बोलत नाही. खा. उदयनराजे भोसले म्हणतात ते उच्च शिक्षित आहेत. परंतु ते शिकले कि ती आहे. त्यांनी कोणत्या पदव्या घेतलेल्या आहे. याचा भिडे यांनी जाहीर खुलासा करावा, असे आव्हाण देत भाजपाच्या राज्यात त्यांना अटक होण्याची शक्यता नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. भिमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हा फार्स आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. पंतप्रधात नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणाचा आजच्या परिस्थितीशी कोणताही संबंध नाही. त्यांनी चुकीचा इतिहास जनतेपुढे मांडला. मोदी देश सांभाळू शकतात तर मग अखिल भारतीय काँग्रेसचे अध्ययक्ष राहूल गांधी देश का सांभाळू शकणार नाहीत. असा सवाल आव्हाड यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.

 

Web Title: The Chief Minister is pulling the government on its own; Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.