मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:08 AM2021-04-06T04:08:02+5:302021-04-06T04:08:02+5:30
नागपूर : राज्य शासनातील तीन मंत्र्यांवर विविध गैरप्रकारांचे आरोप झाले व दोघांना राजीनामे द्यावे लागले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ...
नागपूर : राज्य शासनातील तीन मंत्र्यांवर विविध गैरप्रकारांचे आरोप झाले व दोघांना राजीनामे द्यावे लागले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप तर गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घेतला असता, तर त्यांची नैतिकता दिसली असती. परंतु, शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस हे भ्रष्टाचाराचे महामेरू असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. मुख्यमंत्री अपयशी ठरले असून, त्यांनी नैतिकता पाळत राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यात त्यांची कुठलीही नैतिकता नाही. ज्या सीबीआयला राज्यात चौकशीला सरकार विरोध करत होते, त्यांच्याकडेच गृहमंत्र्यांची चौकशी गेली आहे. आता ही चौकशी थांबवणार का, असा प्रश्नही खोपडे यांनी विचारला.