मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:05 AM2021-01-09T04:05:53+5:302021-01-09T04:05:53+5:30
नागपूर : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता नागपूरच्या डॉ. ...
नागपूर : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत प्रधान सल्लागार अजोय मेहता उपस्थित होते. आज सकाळी विमानतळावर आमदार किशोर जोरगेवार, आमदार आशिष जयस्वाल यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए ) महानगर आयुक्त शीतल तेली- उगले, नागपूर शहर सहआयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, पोलीस उपायुक्त सारंग आवड, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर, भारतीय विमान प्राधिकरणचे उपमहाप्रबंधक सुभाष प्रजापती आदी उपस्थित होते.