नागपुरात मुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:46 AM2018-09-16T00:46:41+5:302018-09-16T00:47:39+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील डॉ. भागवत यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री व सरसंघचालक यांच्यात कुठल्या विषयांवर चर्चा झाली हे कळू शकलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील डॉ. भागवत यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री व सरसंघचालक यांच्यात कुठल्या विषयांवर चर्चा झाली हे कळू शकलेले नाही.
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दुपारी ३.३० च्या सुमारास संघ मुख्यालयात पोहचले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालकांशी सुमारे ४५ मिनिटे चर्चा केली. ४.३० वाजता मुख्यमंत्री संघ मुख्यालयातून बाहेर पडले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत कुठेही या भेटीचा उल्लेख नव्हता. गडकरी व त्यानंतर आता मुख्यमंत्री यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे विविध राजकीय कयास लावण्यात येत आहेत. मंगळवारी डॉ.भागवत यांचा वाढदिवस होता. त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघात व्यक्तीपूजनाला स्थान नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ शुभेच्छा देण्यासाठीच डॉ. भागवत यांची भेट घेतली की आणखी काही कारण होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.