पोलीस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरू करणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:37 PM2019-01-16T23:37:32+5:302019-01-16T23:38:39+5:30

महाराष्ट्र पोलीस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलीस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी पोलीस क्रीडा अकादमी सुरू करण्यात येईल. अकादमीमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Chief Minister's announcement of launch of International Sports Academy for Police force | पोलीस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरू करणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पोलीस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरू करणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्दे महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलीस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी पोलीस क्रीडा अकादमी सुरू करण्यात येईल. अकादमीमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपूर शहर पोलीस मुख्यालय, शिवाजी स्टेडियम येथे बुधवारी ३१ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०१९ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, पोलिस महासंचालक डी. डी. पलसलगीकर, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलिस महासंचालक श्रीमती प्रज्ञा सरोदे, विशेष पोलिस महानिरीक्षक अनूप कुमार सिंग, विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र के. एम. एम. प्रसन्ना उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण वातारवरणात काम करतात. अशावेळी विविध खेळ प्रकारामुळे ताणतणावांचे व्यवस्थापन करणे सोईचे जाते. क्रीडा स्पधेर्मुळे सांघिक भावना निर्माण होते. तसेच संघात खेळत असताना आपण उत्कृष्टपणे खेळावे ही भावना वैयक्तिक जीवनात देखील मदतनीस ठरते. गेल्या चार वर्षांमध्ये शासनाच्या वतीने पोलिस दलासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलिस दलाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिस दलातील खेळाडू तयार होण्यासाठी लवकरच क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाच्या संचलनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्पर्धकांचा शपथविधी पार पडला. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणाºया सोनिया मोकल, राहुल काळे यांनी क्रीडा ज्योत पेटविण्यासाठी मशाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी मशालच्या सहाय्याने क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पधेर्चे रितसर उद्घाटन केले.
सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक उत्तम मोटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये८ परिक्षेत्र, ४ आयुक्तालय तसेच एका प्रशिक्षण केंद्रातून स्पर्धक सहभागी झालेले आहेत. यामध्ये २ हजार ८६४ पोलिस दलातील स्पर्धकांचा समावेश आहे. पैकी २८४ महिला सहभागी आहेत. क्रीडा स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, अ‍ॅथेलिटिक, बॉक्सिंग, स्विमिंग, कुस्ती, वेट लिफ्टिंग तसेच यंदा नव्याने सुरु केलेल्या टायकान्डो तसेच वूशू अशा १६ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
प्रास्ताविक पोलिस महासंचालक डी. डी. पलसलगीकर यांनी केले. संचालन आणि आभार पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी मानले. यावेळी पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, पोलिस अधीक्षक राकेश ओला, सहाय्यक पोलिस क्रीडा अधिकारी बाजीराव कलंत्रे, समादेश जावेद अहमद तसेच पोलिसांचे आप्त स्वकीय उपस्थित होते.

Web Title: Chief Minister's announcement of launch of International Sports Academy for Police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.