मुख्य सचिवांची भांडेवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट

By admin | Published: September 12, 2016 03:07 AM2016-09-12T03:07:42+5:302016-09-12T03:07:42+5:30

राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी भांडेवाडी येथील १३० एम. एल. डी. जलशुद्धीकरण प्रकल्पास रविवारी भेट देऊन पाहणी केली.

Chief Secretary's visit to Bhandewadi Water Purification Project | मुख्य सचिवांची भांडेवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट

मुख्य सचिवांची भांडेवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट

Next

१३० एमएलडी सांडपाण्याचे शुद्धीकरण : कोराडी येथे वीज निर्मिती
नागपूर : राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी भांडेवाडी येथील १३० एम. एल. डी. जलशुद्धीकरण प्रकल्पास रविवारी भेट देऊन पाहणी केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना आणि इतर कामांवर मुख्य सचिवांनी समाधान व्यक्त करीत अशाप्रकारचे अभिनव प्रकल्प राज्यातील सर्व शहरातही राबविण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, नागपूर महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मनपाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार व महानिर्मितीचे मुख्य अभियंता अनंत देवतारे प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान बिपीन श्रीमाळी यांनी मुख्य सचिवांना भांडेवाडी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सध्या येथे नाल्यातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते सर्व पाणी १९ कि.मी. लांब असलेल्या महानिर्मितीच्या कोराडी येथील ३६६० मेगावॉट क्षमतेच्या वीज प्रकल्पापर्यंत १२०० मी. मी. व्यासाच्या पाईप लाईनमधून मागील चार महिन्यांपासून नेले जात आहे. शिवाय आता कोराडी येथील नवीन वीज प्रकल्प त्याच शुद्धीकरण केलेल्या पाण्यावर चालत आहे.
विशेष म्हणजे, या शुद्धीकरण प्रकल्पाची ९० दिवसांची परिपूर्ती हमी चाचणी २१ जुलै २०१६ पासून सुरू झाली असून यात १३० एम.एल.डी. पाणी शुद्धीकरण केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Chief Secretary's visit to Bhandewadi Water Purification Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.