चिखलद-यात पारा चढतोय

By admin | Published: May 4, 2014 12:51 AM2014-05-04T00:51:52+5:302014-05-04T14:49:27+5:30

पर्यटन नगरी, पूर्वीचे हिलस्टेशन व आता गिरीस्थानचा दर्जा असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळाचा पारा चढू लागल्याने पर्यटकही पाठ फिरवू लागले आहेत

Chikhalda-mercury is climbing | चिखलद-यात पारा चढतोय

चिखलद-यात पारा चढतोय

Next

चिखलदरा विदर्भाचे नंदनवन

पर्यटन नगरी, पूर्वीचे हिलस्टेशन व आता गिरीस्थानचा दर्जा असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळाचा पारा चढू लागल्याने पर्यटकही पाठ फिरवू लागले आहेत. गेल्या ११ वर्षांच्या तापमानवर नजर टाकली असता यंदा सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. एकेकाळी उन्हाळ्यात देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी प्रमुख थंड हवेचे ठिकाण, अशी चिखलदºयाची ओळख होती. मागील ११ वर्षांत यामध्ये झपाट्याने बदल झाला आहे. नगर परिषदेच्या नाक्यावर पर्यटकांची संख्या वाढत असली तरी प्रत्यक्षात ती आकडेवारी आॅगस्ट ते फेब्रुवारी या काळातील आहे. या काळातच शाळा-महाविद्यालयांच्या सहली काढण्यात येतात. जवळचे पर्यटनस्थळ म्हणून ‘चिखलदºया’ला प्राधान्य दिले जाते. दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सहल येथे येतात. परिणामी याचा काहीही लाभ येथील व्यावसायीकांना होत नाही. चिखलदºयात दुपारी २ वाजेपर्यंत पारा चढतो. एप्रिल व मे महिन्याचे तापमान कमाल ३७ तर किमान ३० डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. हवेचा वेग ११.१९ किलोमीटर असून आर्द्रता ४५ ते ५५ टक्के एवढी आहे.

पारा चढतोय

सिपना महाविद्यालयातर्फे जागतिक हवामान संघटनेच्या प्रमाणकानुसार हवामानाची नोंद घेतली जाते. थर्मोग्राफ व थर्मामीटर पद्धतीने स्टिव्हसन्स मध्ये हायगोग्राफ व थर्मोग्राफ पध्दतीने नोंद घेतली जात आहे. गेल्या ११ वर्षांत एप्रिल आणि मे महिन्याचे तापमान ३९ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले असून, यावर्षी २९ एप्रिल रोजी ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. उतरत्या पाºयाची सर्वात कमी म्हणजे पाच डिग्री सेल्सिअस नोंद झाली आहे. पावसाचे दिवस झाले कमी ४चिखलदरा या पर्यटन स्थळावरील पावसाळा चेरापुंजीची आठवण करुन देणारा आहे. पूर्वी दीर्घकाळ राहणारा पावसाळा आता लवकर संपतो. परंतु कमी दिवसांत प्रचंड पाऊस बरसतो. पावसाची सरासरी १९८५ ते २०१३ या वर्षात १६०४.३५ एवढी आहे. २०१३ यावर्षी सर्वाधिक २५४८.६ मि.मि. पावसाची नोंद असून १९८७ मध्ये ७५४ मिमि. व २००९ मध्ये ९४६ मि.मि. अशी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्वी १०० दिवसांच्या आसपास पडणारा पाऊस आता ४५ ते ७४ दिवसच कोसळतो. वृक्षतोड प्रमुख कारण ४चिखलदरा व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे जंगलात घट होत आहे. तर दुसरीकडे वृक्ष लागवड होत नसल्याने हिलस्टेशनही तापू लागले आहे.

Web Title: Chikhalda-mercury is climbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.