भाजल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:38+5:302021-08-22T04:11:38+5:30

उमरेड : खेळताना चुलीवरील दुधाचे भांडे अंगावर पडल्याने भाजलेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्यांतर्गतच्या सायकी ...

Child dies of burns | भाजल्याने बालकाचा मृत्यू

भाजल्याने बालकाचा मृत्यू

Next

उमरेड : खेळताना चुलीवरील दुधाचे भांडे अंगावर पडल्याने भाजलेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्यांतर्गतच्या सायकी येथे ६ ऑगस्ट राेजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

युग धनराज ठाकरे (वय ३, रा. सायकी, ता. उमरेड) असे मृत बालकाचे नाव आहे. खेळता खेळता युगचा ताेल गेल्याने त्याच्या अंगावर चुलीवरील गरम दुधाचे भांडे पडले. त्यात ताे ३० टक्के जळाला. लगेच त्याला प्रथम उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान ९ ऑगस्टला डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी मेडिकल पाेलीस बूथच्या सूचनेवरून उमरेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास सहायक फाैजदार ईश्वर जाेधे करीत आहेत.

Web Title: Child dies of burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.