मनपा शाळांत राबविणार बाल स्वच्छता मोहीम
By admin | Published: November 13, 2014 12:55 AM2014-11-13T00:55:22+5:302014-11-13T00:55:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत के स्वच्छ विद्यालय मोहीम सुरू केली आहे. शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पालक
१४ ते १९ दरम्यान विविध कार्यक्र म : सेवाभावी संस्थांचे सहकार्य
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत के स्वच्छ विद्यालय मोहीम सुरू केली आहे. शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पालक व समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान शाळांतून बाल स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार महापालिका शाळांतून ही मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती शिक्षण सभापती चेतना टांक यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
१४ नोव्हेंबर या बालक दिनापासून मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. यानिमित्ताने आठवडाभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात स्वच्छ शाळा व स्वच्छ परिसर, स्वच्छ व संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ शौचालय उपक्रमांचा समावेश आहे.जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्य, प्रभातफेरी, घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्र म राबविण्यात येणार आहे. शासनाचे आदेश म्हणून नव्हे तर शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, यासाठी महापौर प्रवीण दटके यांनी बैठक घेतली. स्वच्छ शाळेला महापौर चषक प्रदान केला जाणार असून, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहे. शाळांमध्ये अस्वच्छता होणार नाही, यासाठी मुख्याध्यापकांनी सतर्क राहण्याचे आदेश आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले आहे. मनपाच्या २८ माध्यमिक व १६६ प्राथमिक शाळांतून ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेला जेसीआय आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. मोहीम संपल्यानंतर दर १५ दिवसांनी शाळांना भेट देण्याची सूचना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी बैठकीत केली. विद्यार्थ्यांना जेसीआय व ग्रीन व्हिजिल व्याख्यान व पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार. तसेच मनपाच्या आरोग्य विभागातर्फे घर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. पत्रपरिषदेला परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, डॉ. कविता रतन यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)