‘मेट्रो’त बसून बच्चे कंपनी करणार धम्माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:11 AM2018-05-19T01:11:13+5:302018-05-19T01:13:17+5:30
नागपुरात मेट्रो धावतेय हे आकर्षण जसे मोठ्यांना आहे तसेच बच्चे कंपनीलाही आहे. उन्हाळी सुट्यांचा योगायोग आणि त्यात मेट्रोची ‘जॉय राईड’ असा आनंददायी अनुभव रविवारी लोकमत कॅम्पस क्लबच्या मुलांना अनुभवता येणार आहे. एकूण २५० मुलांसाठी आयोजित या ‘जॉय राईड’ची उत्सुकता बच्चे कंपनीला आतापासूनच आहे.
नागपूर : नागपुरात मेट्रो धावतेय हे आकर्षण जसे मोठ्यांना आहे तसेच बच्चे कंपनीलाही आहे. उन्हाळी सुट्यांचा योगायोग आणि त्यात मेट्रोची ‘जॉय राईड’ असा आनंददायी अनुभव रविवारी लोकमत कॅम्पस क्लबच्या मुलांना अनुभवता येणार आहे. एकूण २५० मुलांसाठी आयोजित या ‘जॉय राईड’ची उत्सुकता बच्चे कंपनीला आतापासूनच आहे.
नागपूर मेट्रोचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सर्वांगसुंदर खापरी स्टेशनही साकारले आहे. ‘प्लॅटफॉर्म’वरून मेट्रोच्या ‘जॉय राईड’ही सुरू झाल्या आहेत. मात्र, बच्चे कंपनीला ही आनंदी सफर करता आलेली नाही. हेच आकर्षण लक्षात घेऊन ‘लोकमत कॅम्पस क्लब’ने नागपूर मेट्रोच्या सहकार्याने ही राईड आयोजित केली आहे. ‘जॉय राईड’ करण्यासाठी पहिल्यांदा या आणि पहिल्यांदा पासेस मिळवा अशी अट ठेवण्यात आली आहे. यासाठी मुलांना लोकमत भवनातील कॅम्पस क्लबमध्ये १९ मे रोजी सकाळी ११ ते ६ वेळेत पासेससाठी यायचे आहे. २० मे रोजी मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनपासून सकाळी ८ वाजता ही ‘जॉय राईड’ सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९८२२४०६५६२ व ९९२२२०००६३ वर संपर्क करता येईल.
मर्यादित प्रवेश
लोकमत कॅम्पस क्लबच्या एका पासवर त्यांच्यासोबत किमान एकच पालक ‘राईड’ करू शकेल. सर्वांचेच आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोच्या ‘जॉय राईड’ची सफर करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.