नाट्यगीत गायन स्पर्धेत मुलांनी रिझवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:28 AM2020-11-22T09:28:46+5:302020-11-22T09:28:46+5:30
नागपूर : बालकदिनाच्या निमित्ताने बालरंगभूमी परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे नाट्यगीत गायन स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरित गोवा येथील अन्सिका ...
नागपूर : बालकदिनाच्या निमित्ताने बालरंगभूमी परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे नाट्यगीत गायन स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरित गोवा येथील अन्सिका नाईक प्रथम, यवतमाळची श्रुती सरोदे द्वितीय, अकोल्याचा स्वरेश चापके तृतीय क्रमांकाने विजयी झाले. स्पर्धेत प्रथम उत्तेजनार्थ यवतमाळचा वेदांग कोरटकर तर द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी नागपूरची गौर नाईक ठरली आहे. गुणवंत घटवई, मनीष मोहरील, वीरेंद्र लाटणकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. संचालन अवंतिका लाटणकर व वैदेही चवरे यांनी केले. प्रास्ताविक विलास कुबडे तर आभार योगेश राऊत व रोशन नंदवंशी यांनी मानले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहल पाळधीकर, मृण्मयी कुळकर्णी, आभा मेघे उपस्थित होते.
....................