‘चीन’विरोधी मोहीम संघ तळागाळापर्यंत नेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 11:24 PM2017-08-06T23:24:07+5:302017-08-06T23:24:07+5:30

डोकलामच्या मुद्यावरून चीनकडून भारताला धमकविण्याचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिनी वस्तूंविरोधात हल्लाबोल केला आहे.

China's anti-China campaign will go to grassland | ‘चीन’विरोधी मोहीम संघ तळागाळापर्यंत नेणार

‘चीन’विरोधी मोहीम संघ तळागाळापर्यंत नेणार

Next

नागपूर, दि. 6 : डोकलामच्या मुद्यावरून चीनकडून भारताला धमकविण्याचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिनी वस्तूंविरोधात हल्लाबोल केला आहे. विदर्भ प्रांतामध्ये राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहीम सुरू असून याला अगदी तळागाळापर्यंत नेण्यात यावे, असे निर्देश संघ पदाधिकाºयांकडून देण्यात आले आहे. संघ परिवारातील विविध संघटनांची रविवारी समन्वय बैठक पार पडली. चीनचे आर्थिक आक्रमण परतवून लावण्यासाठी सर्व संघटनांनी ही मोहीम गंभीरतेने घ्यावी, असे स्पष्टपणे संघातर्फे सांगण्यात आले. संघातर्फे रेशीमबाग स्मृतिमंदिर येथे विविध संघटनांची बैठक घेण्यात आली. यात भाजपा, स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ, भाजयुमो, अभाविप, ग्रंथालय भारती यांच्यासह संघ प्रेरणेतून कार्य करत असलेल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महानगर संघचालक राजेश लोया व सहसंघचालक श्रीधर गाडगे हे उद्घाटन सत्रादरम्यान प्रामुख्याने उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार यांच्यासह भाजपातील विविध पदाधिकारी उपस्थित होते चीनचा मुद्दा हा देशाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. चीनचे आर्थिक स्रोत बंद व्हावेत यासाठी चिनी वस्तूंच्या विरोधात राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे ही स्वयंसेवकांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी या मोहिमेत सहभागी होऊन चीनला आर्थिक धक्का दिला पाहिजे, असे लोया यांच्यातर्फे सांगण्यात आले. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांतील यशानंतर संघ परिवारातील संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त जनहिताची कामे होणे अभिप्रेत आहे. यासाठी सर्व संघटनांमध्ये समन्वय प्रभावी असला पाहिजे. त्यामुळे अंतर्गत संवाद व इतर संघटनांशी समन्वय यावर विशेष भर दिला पाहिजे, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

Web Title: China's anti-China campaign will go to grassland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.