उपराजधानीत चिनी फटाक्यांची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:43 AM2018-11-08T10:43:05+5:302018-11-08T10:45:10+5:30

चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे.

Chinese crackers in demand in Nagpur | उपराजधानीत चिनी फटाक्यांची धूम

उपराजधानीत चिनी फटाक्यांची धूम

Next
ठळक मुद्देधोक्याची शक्यता निर्बंधानंतरही लपूनछपून विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणामधील काही ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर्रास विकत आहेत. तर किरकोळ विक्रेत्यांकडून हे फटाके गल्लीबोळात व चौकाचौकांमध्ये विकले जात आहे.
गांधीबाग, जरीपटका, इतवारीतील लालईमली परिसर व आता सीए रोडवरील अनेक दुकानदार फटाक्यांच्या बंदुकी विकतात. परंतु यातील काही बंदुकीसोबतच चिनी फटाकेही विकतात. यात चिनी रॉकेटपासून, भूचक्र, पटक बॉम्ब (पॉपपॉप), पेन्सील, पायली, विविध आकारातील ‘बॉम्ब’ यासारख्या अनेक फटाक्यांचा समावेश आहे. सूत्रानुसार, अनेक दुकानदारांनी चिनी फटाक्यांचा हा साठा दुकानात न ठेवता कुणी आपल्या घरी तर कुणी भाड्याच्या खोलीत केला आहे. येथून हा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत किंवा ग्राहकांच्या घरात पोहचत आहे.

मिसाईलचा वापर बंदुकीच्या गोळीसारखा
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चिनी फटाके आणखी धोकादायक प्रकारात आले आहे. पूवी ‘पॉपपॉप’ हा पावइंचात येत होता. यावर्षी तो एक आणि दोन इंचात आला आहे. कागदाच्या वेष्टनात असलेल्या या फटाक्याला खाली पटकताच फुटतो. दुसरा फटाका म्हणजे, मिसाईल. एका चिनी बंदुकीत गोळीसारखा वापरला जाणारा हा फटका आहे. खऱ्याखुºया बंदुकीसारखाच याचा वापर होतो. सर्वात धोकादायक म्हणजे, ‘हॅण्ड ग्रेनेड’ फटाका. याचा वापर मूळ ‘ग्रेनेड’ सारखाच होतो. या फटाक्याला एक हुक दिला आहे. हा हुक एका दोरीला बांधला आहे. हुक खिचताच फटाक्यातून धूर निघतो आणि काही सेकंदातच तो फुटतो.

फटाक्यातील पोटॅशियम परक्लोरेटवर बंदी
चिनी फटाक्यांमध्ये हलक्या प्रतिची पोटॅशियम क्लोरेट पावडर वापरली जाते. या पावडरची किंमत सुमारे ५० रुपये किलो आहे. तर भारतीय फटाक्यांसाठी वापरली जाणारी पावडर ३०० रुपये किलो आहे. त्यामुळे चिनी फटाके किती धोकादायक आहेत हे सहज लक्षात येते. भारतात फटाक्यांची निर्मिती करताना पोटॅशियम परक्लोरेटचा वापर करण्यावर बंदी आहे.

चिनी फटाक्यांमध्येही बनावट
चिनी फटाक्यांवर निर्बंध आल्याने नागपुरात त्याच्यासारखे दिसणारे फटाके बाजारात आले आहेत. विशेषत: पटक बॉम्ब (पॉपपॉप) हा फटाका नागपुरात मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. ठोक विक्रेत्यांकडे तो आठ ते दहा रुपये किमतीला उपलब्ध आहे. परंतु तो फुटतच नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

आरोग्यास हानिकारक
चिनी फटाके आरोग्यास हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. या फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरलेला कच्चा माल मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो. या फटाक्यांच्या धुराने केवळ प्रदूषणच नव्हे, तर अंधत्व येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Chinese crackers in demand in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी