चीनचे उपमहावाणिज्यदूत मिहानमध्ये

By admin | Published: June 22, 2016 03:01 AM2016-06-22T03:01:17+5:302016-06-22T03:01:17+5:30

चीनचे मुंबई येथील उपमहावाणिज्यदूत ली युआनलिंग यांनी चीनच्या व्यावसायिक प्रतिनिधींसोबत सोमवारी मिहानला भेट देऊन येथील पायाभूत सुविधा व विकास कामांची पाहणी केली.

Chinese Deputy Mayor Mihan | चीनचे उपमहावाणिज्यदूत मिहानमध्ये

चीनचे उपमहावाणिज्यदूत मिहानमध्ये

Next

चीनमधील व्यवसाय प्रतिनिधींचा समावेश : प्रकल्प सर्वोत्तम असल्याचा शेरा
नागपूर : चीनचे मुंबई येथील उपमहावाणिज्यदूत ली युआनलिंग यांनी चीनच्या व्यावसायिक प्रतिनिधींसोबत सोमवारी मिहानला भेट देऊन येथील पायाभूत सुविधा व विकास कामांची पाहणी केली. मिहान प्रकल्प आणि सुविधा सर्वोत्तम असल्याचा शेरा त्यांनी दिला.
प्रतिनिधी मंडळाने मिहानमधील उड्डाण पूल, रस्त्यांचे नेटवर्क, टेलिकॉम सेंटर, पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, फायर स्टेशन, वेअरहाऊस, निवासी टाऊनशिप आदींची पाहणी केली. त्यांनी या परिसरात सुरू असलेल्या बोर्इंग, टीसीएस, टेक महिन्द्रा आदींच्या बांधकामस्थळाला भेट दिली. प्रतिनिधींनी मिहानच्या मध्यवर्ती इमारतीची पाहणी केली.
सर्व प्रतिनिधींचे एमएडीसीचे मुख्य अभियंते एस.के. चॅटर्जी, वरिष्ठ अभियंते रजनी लोणारे, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी एमएडीसीचे विपणन व्यवस्थापक अतुल ठाकरे उपस्थित होते. एमएडीसीचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी मिहानवर शॉर्टफिल्म दाखविली.
चीन येथील कंपन्या मिहान प्रकल्पात नक्कीच गुंतवणूक करतील, असा विश्वास ली युआनलिंग यांनी व्यक्त केला. तसेच नवीन विमानतळ आणि मिहानमध्ये अन्य सुविधांच्या विकासात भागीदार राहील, असे सांगितले.
चीनच्या प्रतिनिधी मंडळात शुई छांग युई, ली शिआॅन, जिआंग तुंगफंग, चांग क्वान युई, पी.पो. हाओ. कुओ ई कून, चाओ निंग आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Chinese Deputy Mayor Mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.