चिटियाँ कलाईया वे...

By Admin | Published: May 18, 2015 02:34 AM2015-05-18T02:34:13+5:302015-05-18T02:34:13+5:30

नागपूरकरांचा दुसरा रविवारही काँग्रेसनगरातील धनवटे कॉलेजच्या मैदानावर ‘एन्जॉयफूल’ ठरला.

Chitas kalayya te ... | चिटियाँ कलाईया वे...

चिटियाँ कलाईया वे...

googlenewsNext

नागपूरकरांचा दुसरा रविवारही काँग्रेसनगरातील धनवटे कॉलेजच्या मैदानावर ‘एन्जॉयफूल’ ठरला. झुंबा डान्सने तर माहोल केलाच. पण भांगडानेही तितकीच धूम केली. सुरूवातीला जुन्या गाण्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. काही बालपणीत रमून गेले. ‘लिंबो स्केटिंग’चा थरार...आईचे पत्र हरवले, लगोरी, दोरीवरच्या उड्या, विटीदांडू, सायकलिंग कबड्डी, लंगडी, रस्सी खेचने या आनंदात भर घातली. ‘लोकमत धमाल गल्ली’ची मौज आठवडाभर कर्णोपकर्णी अवघ्या शहरात पोहोचल्याने यावेळचा प्रतिसाद उदंड होता. यावेळी सादर झालेल्या ‘चिटियाँ कलाईया वे...’ या गाण्यावर ताल धरत नागपूरकर अक्षरश: बेभान होऊन नाचले. धनवटे नॅशनल कॉलेजचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले.

Web Title: Chitas kalayya te ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.