राज्यातील २१ हजार ग्राहकांनी निवडला ‘गो-ग्रीन’ वीजबिलाचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:12 PM2019-01-10T23:12:37+5:302019-01-10T23:13:18+5:30

वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपुरात ६३० आणि वर्धा जिल्ह्यात २२० अशा एकूण ८५० वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत ‘गो ग्रीन’ अंतर्गत नावाची नोंदणी केली आहे.

The choice of 'go-green' electricitybill was selected by 21,000 customers in the state | राज्यातील २१ हजार ग्राहकांनी निवडला ‘गो-ग्रीन’ वीजबिलाचा पर्याय

राज्यातील २१ हजार ग्राहकांनी निवडला ‘गो-ग्रीन’ वीजबिलाचा पर्याय

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरण : नागपूर परिमंडळात ८५० वीज ग्राहकांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपुरात ६३० आणि वर्धा जिल्ह्यात २२० अशा एकूण ८५० वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत ‘गो ग्रीन’ अंतर्गत नावाची नोंदणी केली आहे.
वीजबील ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप व  संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतु जे ग्राहक ‘गो-ग्रीन’ सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडणाºया ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे.
नागरिकांनी घ्यावा लाभ
गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.

Web Title: The choice of 'go-green' electricitybill was selected by 21,000 customers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.