नागपूर जिल्ह्यातही कॉलराची ‘एन्ट्री’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 08:00 AM2022-07-13T08:00:00+5:302022-07-13T08:00:01+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले.

Cholera's 'entry' in Nagpur district too! | नागपूर जिल्ह्यातही कॉलराची ‘एन्ट्री’!

नागपूर जिल्ह्यातही कॉलराची ‘एन्ट्री’!

googlenewsNext
ठळक मुद्देडायरियाचे आठ, तर गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

सुमेध वाघमारे

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील पाच डोंगरी आणि कोयरी या गावात ‘कॉलरा’मुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा जलजन्य आजाराची भीती व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले. या संख्येवरून घाबरण्याचे कारण नसलेतरी खबरदारी घेण्याचा आवाहन केले जात आहे.

सध्या सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी व ग्रामीण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजना, धरणे, विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. यातूनच जलजन्य आजार वाढून आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- ८० टक्के आजार दूषित पाण्यामुळे

पाण्याच्या दूषितपणात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा जलाशयातील जीवजंतूंवरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. जवळपास ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. यामुळे पाण्याच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

-मे २०२२पर्यंत गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात २०२०मध्ये कॉलराचा एकही रुग्ण नव्हता. परंतु २०२१ मध्ये ३ तर, मे २०२२पर्यंत तीन रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये डायरियाचे ४७ रुग्ण आढळून आले असताना २०२१ मध्ये यात वाढ होऊन रुग्णसंख्या १५७ पोहचली. यावर्षी मेपर्यंत आठ रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १६१ असताना, २०२१मध्ये केवळ ४, तर मे २०२२पर्यंत ५५ रुग्ण आढळून आले. २०२० मध्ये टायफाइडचे तीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मे २०२०पर्यंत आरोग्य विभागाकडे एकाही रुग्णांची नोंद नाही.

-कॉलरा अत्यंत वेगाने पसरू शकतो

पटकी म्हणजे ‘कॉलरा’ हा दूषित पाण्यामुळे पसरणारा जलजन्य आजार आहे. कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरू शकतो. इतर कोणत्याही जलजन्य आजाराच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. जुलाब व उलट्या हे या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य उपचाराअभावी जलशुष्कता होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.

- पाणी उखळून, गाळून व थंड करूनच प्या

दूषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर आदी आजार प्रामुख्याने होतात. हे होऊ नयेत यासाठी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे. घरामध्ये पाणी साठवून ठेवू नका. पिण्याच्या पाण्याचे भांडे स्वच्छ धुवा व हाताची स्वच्छता ठेवा.

-डॉ. वनिता जैन, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर

 

Web Title: Cholera's 'entry' in Nagpur district too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य