नाताळाच्या सुट्यात पर्यटनाची धूम!

By admin | Published: December 26, 2015 03:48 AM2015-12-26T03:48:14+5:302015-12-26T03:48:14+5:30

सध्या नाताळाच्या सुट्या सुरू असून, यात अनेकांनी छोट्यामोठ्या सहलीच्या योजना आखल्या आहेत.

Christmas shade tourism! | नाताळाच्या सुट्यात पर्यटनाची धूम!

नाताळाच्या सुट्यात पर्यटनाची धूम!

Next

जंगल पर्यटनाला पसंती : व्याघ्र प्रकल्प, उद्याने, अभयारण्य गजबजली
नागपूर : सध्या नाताळाच्या सुट्या सुरू असून, यात अनेकांनी छोट्यामोठ्या सहलीच्या योजना आखल्या आहेत. यातून जिकडे-तिकडे पर्यटनाची धूम दिसून येत आहे. यामुळे नागपूरशेजारची सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली आहेत. मागील दोन दिवसांपासून जवळपास सर्वच शाळांना नाताळाच्या सुट्या लागल्या आहेत. शिवाय शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागोपाठ चार दिवसांच्या सुट्या मिळाल्या आहेत. ही संधी साधून अनेक परिवार नाताळाच्या सुट्यांसह पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटत आहे.
यामुळे नागपूरच्या सभोवतालची ऐतिहासिक पर्यटन स्थळे, व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, धार्मिक स्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजली आहेत. यात जंगल पर्यटनाला प्रथम पसंती दिली जात आहे. त्यामुळे सर्व जंगल पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह पेंच, नवेगाव-नागझिरा, कोका, बोर व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. माहिती सूत्रानुसार महा इको टुरिझमच्या वेबसाईटवर पर्यटकांची मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. मागील काही वर्षांत पर्यटकांचे जंगलाकडे विशेष आकर्षण वाढले आहे. शिवाय वन विभाग सुद्धा पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांवरही गर्दी दिसून येत आहे. नागपूरपासून काहीच अंतरावर असलेले रामटेक येथील ६०० वर्षे जुने प्राचीन राममंदिर, पारडसिंगा येथील अनसूया माता मंदिर, आदासा येथील गणपती मंदिर, धापेवाडा, नगरधनचा किल्ला व वर्धा जिल्ह्यात पवनार पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Christmas shade tourism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.