शुभम महाकाळकरच्या हत्येची सीआयडी चौकशी व्हावी

By admin | Published: December 27, 2016 03:02 AM2016-12-27T03:02:43+5:302016-12-27T03:02:43+5:30

शुभम महाकाळकर या तरुणाच्या हत्या प्रकरणाची स्टेट सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अश ी

CID inquiry should be done for the murder of Shubham Mahakalikar | शुभम महाकाळकरच्या हत्येची सीआयडी चौकशी व्हावी

शुभम महाकाळकरच्या हत्येची सीआयडी चौकशी व्हावी

Next

नागपूर : शुभम महाकाळकर या तरुणाच्या हत्या प्रकरणाची स्टेट सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अश ी मागणी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी सोमवारी एका पत्रपरिषदेत केली.
विशेष म्हणजे, या घटनेनंतर आ. खोपडे यांनी प्रथमच मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडली. ते पुढे म्हणाले, अभिलाष आणि रोहित या त्यांच्या मुलांसह सात जणांविरुद्ध एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या दबावात चौकशी अधिकाऱ्यांनी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. त्यामुळे यासंबंधी आपण थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या संपूर्ण प्रकरणाची स्टेट सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्लाऊड सेव्हन बारमधील भांडण बिलावरून नव्हे तर एक काचेचा ग्लास फुटल्यामुळे झाले होते. शिवाय त्यात सन्नी बम्ब्रोतवार याला किरकोळ जखम झाली होती. असे असताना पोलिसांनी सूडबुद्धीने अभिलाष व रोहित यांच्यासह अन्य सात आरोपींविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. यात शुभमची ज्या पद्घतीने हत्या करण्यात आली, त्याचा मास्टरमार्इंड आणि मुख्य आरोपी हा सन्नी बम्ब्रोतवार हाच असल्याचे दिसून येते.
त्यामुळे या हत्या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून त्यात प्रख्यात वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणात बार मालक आणि पोलिसांनी साठगाठ करून आरोपीविरुद्घ कलम ३०२ ऐवजी ३२६ चा गुन्हा दाखल केला आहे. यावरून पोलीस मुख्य आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पोलीस शुभमच्या खुनाचे प्रकरण दाबून ज्यांचा या घटनेशी संबंध नाही, अशा मुलांवर गुन्हा दाखल करून लोकांचे लक्ष विचलित करीत असल्याचेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास व आ. मिलिंद माने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

‘तो ’ वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण ?
या संपूर्ण प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या दबावात अभिलाष आणि रोहितसह अन्य सात जणांविरुद्ध सुडबूद्घीने कारवाई करण्यात आली असल्याचा यावेळी आ. खोपडे यांनी आरोप करून, संबंधित पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. आ. खोपडे म्हणाले, या प्रकरणी आपण शहर पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त (क्राईम), पोलीस उपायुक्त झोन क्र. २, अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पीएसआय व पीआय (क्राईम) यांच्याशी फोनवरून अनेकदा चर्चा करून, त्यांची भेट घेतली. दरम्यान सर्वांनी बारमधील घटनेशी चारच मुलांचा संबंध असल्याचे सांगितले, तसेच आमच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले, असाही यावेळी खोपडे यांनी दावा केला. यामुळे ‘तो’ वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केले
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कलम ३०७ प्रकरणी ऐतिहासिक निर्णय देऊन तक्रारकर्त्यांची तक्रार चुकीची ठरवून बारमालकांनीच आपल्या मुलांवर हल्ला केला असल्याचे व तक्रार खोटी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र असे असताना पोलिसांनी बार मालकाच्या दबावाखाली अभिलाष आणि रोहित ही केवळ आमदार खोपडे यांची मुले आहेत, म्हणून त्यांच्याविरुद्ध सुडबुद्धीने कारवाई केली आहे. यातून पोलिसांनी आपल्या दोन्ही मुलांसह सातही तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: CID inquiry should be done for the murder of Shubham Mahakalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.