रेशीमबाग मैदानावर सर्कसला परवानगी देणे शेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:14 AM2018-06-14T00:14:08+5:302018-06-14T00:14:56+5:30

रेशीमबाग मैदानावर सर्कस आयोजित करण्याची परवानगी दिल्यामुळे दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाची शेकली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रेशीमबाग मैदान दुरुपयोगाच्या प्रकरणात विद्यालयाला प्रतिवादी करण्यास सांगितले. तसेच, विद्यालयाला नोटीस बजावून संस्थेचे सचिव किंवा अध्यक्षाने २७ जून रोजी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, असा आदेश दिला.

Circle permitting on the field at the Rasimbagh ground | रेशीमबाग मैदानावर सर्कसला परवानगी देणे शेकले

रेशीमबाग मैदानावर सर्कसला परवानगी देणे शेकले

Next
ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका : दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाला केले प्रतिवादी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशीमबाग मैदानावर सर्कस आयोजित करण्याची परवानगी दिल्यामुळे दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाची शेकली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रेशीमबाग मैदान दुरुपयोगाच्या प्रकरणात विद्यालयाला प्रतिवादी करण्यास सांगितले. तसेच, विद्यालयाला नोटीस बजावून संस्थेचे सचिव किंवा अध्यक्षाने २७ जून रोजी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, असा आदेश दिला.
नागपूर सुधार प्रन्यासने रेशीमबाग मैदानाचा एक भाग दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाला खेळाकरिता वापरण्यासाठी दिला आहे. गेल्या २८ मे रोजी विद्यालयाने या भागावर ३ जून ते १६ जुलैपर्यंत म्हणजे ४३ दिवसाकरिता सर्कस आयोजित करण्याची परवानगी दिली होती. गेल्या ६ जून रोजी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने नासुप्र व मनपाला यावर स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर हे प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्यामुळे विद्यालयाने त्याच दिवशी सर्कसची परवानगी रद्द केली. त्यानंतरही न्यायालयाने विद्यालयाला दणका दिला.
नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने कार्यकारी अधिकारी संजय पोहेकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाला स्पष्टीकरण दिले. त्यानुसार, नासुप्रनेही ८ जून रोजी विद्यालयाला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. विद्यालयाला सुनावणीची संधी दिल्यानंतर आवश्यक आदेश जारी केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने अतिरिक्त उपाआयुक्त राजेश मोहिते यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून मनपाच्या आरोग्य व अग्निशमन विभागांनी सर्कसला ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते अशी माहिती दिली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर हे यात न्यायालय मित्र आहेत. मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.

क्रीडा संकुल लग्नासाठी नाही
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल आतापर्यंत कधीच लग्न समारंभ व अन्य कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात आले नाही. हे संकुल केवळ क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी भाड्याने दिले जाते अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी न्यायालयाला दिली. तसेच, क्रीडा उपसंचालकांचे यासंदर्भातील १२ जूनचे पत्र न्यायालयात सादर केले.

Web Title: Circle permitting on the field at the Rasimbagh ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर