विदर्भातील ११ जिल्ह्यांना सिकलसेलचा विळखा
By admin | Published: August 10, 2016 12:45 AM2016-08-10T00:45:50+5:302016-08-10T00:45:50+5:30
विदर्भात ‘मॉजेले’ची गरज; अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये प्रादुर्भाव जास्त.
अकोला, दि. 0९:: जीवघेण्या सिकलसेल आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृतीसह प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. तसे होत नसल्यामुळे सिकलसेल रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये दीड लाखापेक्षा अधिक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आहे. रुग्ण संख्येला आळा घालून आजाराचे अचूक निदान करण्यासाठी विदर्भात ह्यमॉजेलेह्ण( मॉलिक्युलर जेनेटीक लेबॉरेटरी)स्थापन करण्याची नितांत गरज आहे.
संतान उत्पत्तीच्या माध्यमातून सिकलसेल आजाराचा फैलाव होतो. अतिदुर्गम भागात राहणार्या नागरिकांमध्ये या आजाराचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नंदूरबार, यवतमाळसह ११ जिल्ह्यांमध्ये सिकलसेल आजाराचे दीड लाख रुग्ण आहेत. आजाराला आळा घालण्यासाठी लग्नापूर्वी तरुण-तरुणींमध्ये जागृती-समुपदेशन करणे, रक्ताच्या चाचण्या करणे व ज्या महिलांनी सिकलसेलग्रस्त बालकांना जन्म दिला त्यांचे योग्यरीत्या लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सक्षम असणे अपेक्षित आहे. सिकलसेलचा प्रसार होऊ नये, यासाठी जनजागरण प्रभावी माध्यम आहे. संबंधित रुग्णाला वर्षातून किमान तीन ते चार वेळेस रुग्णालयात भरती व्हावे लागते. उपचारासाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. रुग्णाच्या जन्मापासून ते त्याच्या अंतापर्यंत हा प्रवास सुरू असल्यामुळे संबंधित कुटुंबीयांना मार्गदर्शनासह शासनाच्या उपाययोजनांची गरज आहे. २00८ ते २0१४ कालावधीत तत्कालीन केंद्र सरकारने राज्य शासनाला १0९ कोटी रुपये दिले होते. या निधीची योग्यरीत्या अंमलबजावणी न झाल्यामुळे रुग्णांना अद्यापही सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
विदर्भात ह्यमॉजेलेह्णची गरज
राज्यात सिकलसेलचा सर्वाधिक प्रभाव विदर्भातील ११ जिल्ह्यांत आहे. देशातील २0 पैकी चार ह्यमॉजेलेह्ण सिकलसेल अस्तित्वात नसलेल्या पुणे,मुंबई शहरासाठी प्रत्येकी दोन मंजूर झाले. शिवाय सिकलसेलचे मुख्यालय मुंबईत आहे.
दुर्गम भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. आजाराला आळा घालण्यासाठी जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे. रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे.
-संपत रामटेके, अध्यक्ष सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर.