नासुप्रच्या भरमसाट विकास शुल्कामुळे नागरिक संतप्त

By admin | Published: May 28, 2016 02:59 AM2016-05-28T02:59:12+5:302016-05-28T02:59:12+5:30

नागपूर सुधार प्रन्यासतर्फे पाठविण्यात आलेल्या भरमसाट विकास शुल्कामुळे चिखली खुर्द परिसरातील नागरिक संतापले आहेत.

Citizens are angry because of the sweeping development charges of Nasupara | नासुप्रच्या भरमसाट विकास शुल्कामुळे नागरिक संतप्त

नासुप्रच्या भरमसाट विकास शुल्कामुळे नागरिक संतप्त

Next

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निवेदन सादर
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासतर्फे पाठविण्यात आलेल्या भरमसाट विकास शुल्कामुळे चिखली खुर्द परिसरातील नागरिक संतापले आहेत. या संतप्त नागरिकांनी शुक्रवारी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी तथा नासुप्र सभापती सचिन कुर्वे यांच्याशी सविस्तर चर्चा करीत निवेदन सादर केले.
मौजा चिखली खुर्द मधील विट्ठल नगर नं २, अमर नगर खसरा क्र २३ वर रिंग रेल्वे नंतर बफर झोनचे आरक्षण टाकण्यात आलेले होते. शासनाने ते रद्द केले आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सरस्वती नगर गुरुकुंज नगर न्यू अमर नगरला खसरा क १९,२२,२२/१, २४,२५ हे नगरसुध्दा भूखंड रिंग रेल्वे बफर झोन अंतर्गत येत होते. तरी त्याना २२ रुपये प्रमाणे डिमांड नोट देण्यात आलेली आहे वरील सर्व विट्ठल नगर नं २ अमरनगर या चारही दिशाच्या मध्यभागी आहे खसरा क्रं २३ ला डिमांड नोट देण्यात आलेली नव्हती. आता अर्ज सादर केलेल्या खसरा क्रं २३ या भूखंडाला आरक्षण वगळलेले असल्यास ५६ रुपये दराने मागणी पत्र देण्यात आले आह.े त्यामुळे १० ते २० हजार रुपयांच्या भूखडांचे विकास शुल्क लाखात मोजावे लागणार आहे.
या चिंतेत या परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. त्यामुळे पीड़ित नागरिकांनी शुक्रवारी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बंटी शेळके आणि समीर काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून जिल्हाधिकारी तथा नासुप सभापती सचिन कुर्वे यांना निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेत नासुप्र सभापतींनी ‘माझ्या अधिकारात विकास शुल्क कमी करून देता आले तर मी नक्कीच कमी करेल, अन्यथा शासनाकडे शिफारस केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी अमित पाठक, विवेक पांडेय, मुरलीधर काळे, विश्वनाथ वाघमारे, बालकृष्ण रोडे, दीपक पंत, वसंत तरुड़कर, विलास वाकडे, किसन ठाकरे, रमेश टोंगसे, गणपत चोपडे, राजू ठोंबरे आदींसह भूखंडधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Citizens are angry because of the sweeping development charges of Nasupara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.