नासुप्र व एनएमआरडीए कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:08+5:302021-04-08T04:08:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सदर येथील नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर ...

Citizens are denied access to Nasupra and NMRDA offices | नासुप्र व एनएमआरडीए कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद

नासुप्र व एनएमआरडीए कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सदर येथील नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना कार्यालयाशी संबंधित काही कामे असल्यास त्यांनी आपले अर्ज ऑनलाइन स्वरूपात नासुप्रच्या nagpurnit@hotmail.com व नामप्रविप्राच्या nmrda@hotmail.com या अधिकृत ई-मेलवर पाठवता येईल.

इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा ज्या नागरिकांना ई-मेल करता येत नसल्यास अशा नागरिकांसाठी नासुप्रच्या मुख्य कार्यालयातील प्रवेशद्वारावर ड्रॉप बॉक्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी याठिकाणी आपले लिखित अर्ज जमा करावेत, असे आवाहन ‘नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा ‘नासुप्र’चे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे. अर्जाची पोच पावती नागरिकांना त्यांच्या दिलेल्या मोबाइल क्रमांकावर, व्हाॅट्सॲप अथवा ई-मेलवर देण्यात येईल.

राज्य शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले असून, नागरिकांनी नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात येणे टाळावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, असे आवाहन केले आहे.

Web Title: Citizens are denied access to Nasupra and NMRDA offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.