सोलर रूफ टॉप सबसिडीपासून नागरिक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:35+5:302021-09-10T04:12:35+5:30
नागपूर : केंद्र सरकारतर्फे सोलर रूफ टॉप लावण्यात येणाऱ्या सबसिडीपासून महाराष्ट्रातील नागरिक वंचित राहत असल्याचा आरोप सोलर उपकरणे निर्मात्यांची ...
नागपूर : केंद्र सरकारतर्फे सोलर रूफ टॉप लावण्यात येणाऱ्या सबसिडीपासून महाराष्ट्रातील नागरिक वंचित राहत असल्याचा आरोप सोलर उपकरणे निर्मात्यांची संघटना ‘मास्मा’च्या विदर्भ चॅप्टरच्या बैठकीत करण्यात आला आहे. याकरिता या संदर्भात असलेले महावितरणचे धोरण कारणीभूत असून त्यात बदल करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
बैठकीत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहडिया, व्हीआयएचे उपाध्यक्ष सुधीर बुद्धे आणि भाजपा उद्योग आघाडीचे संयोजक गिरधारी मंत्री उपस्थित होते.
मंत्री म्हणाले, महावितरणने तीन हजार एजन्सींकडे कानाडोळा करून सोलर रूफ टॉप सबसिडीकरिता २६ एजन्सींची नियुक्ती केली आहे. या एजन्सी नागरिकांचे अर्ज चक्क फेटाळून लावत आहेत. बुद्धे म्हणाले, या संदर्भात जारी केलेल्या निविदा प्रक्रियेतील त्रुटींमुळे नागरिकांना नुकसान होत आहे. ‘मास्मा’चे क्षेत्रीय संचालक अमित देवतळे यांनी सोलरच्या लघु व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जर महावितरण सोलर सबसिडी योजनेचे संचालन करीत नसेल तर ही योजना महाऊर्जाकडे हस्तांतरित करावी.
बैठकीत पंकज खिरवडकर, कृणाल इटनकर, मिलिंद उमप, विक्रम धाडीवाल, प्रथमेश पानबुद्धे, पंकज अग्रवाल, साकेत सुरी, ए.के. सिंह उपस्थित होते.