नागरिकांनाे, अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणासाठी पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:03+5:302021-05-10T04:09:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गुमगाव : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याला राेखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाबाबत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गुमगाव : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याला राेखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाबाबत काेणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणासाठी बिनधास्तपणे पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशाेर फुटाणे यांनी केले.
वागदरा (नवीन गुमगाव) येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या लसीकरण आढावा बैठकीत अतिरिक्त सीईओ फुटाणे यांनी संवाद साधला. याप्रसंगी खंडविकास अधिकारी विश्वास सलामे, नायब तहसीलदार ज्योती भोसले, आरोग्य विस्तार अधिकारी विनायक ढगे, रवींद्र परतेकी, सरपंच प्रेमनाथ पाटील, उपसरपंच किशोर पडवे तसेच अरविंद वाळके, अक्षय कामडी, राजकुमार अडकणे, शोभा माहुरे, विजया आष्टनकर, रंजना भगत, लक्ष्मी हुलके, ग्रामसेविका सुहासिनी कोल्हे, प्रशांत चिमोटे, हरीश गभणे, लंकेश माहुरे, निरंजन चामाटे, नंदू सोमकुवर, मंडळ अधिकारी मुकुंदा मडावी आदी उपस्थित होते. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, बचत गट, ग्रामपंचायत तसेच महसूल व आरोग्य विभागातील कर्मचारी आणि प्रत्येक समाजघटकाने नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करून लसीकरणाचा वेग वाढवावा, असे आवाहन खंडविकास अधिकारी विश्वास सलामे यांनी यावेळी केले.