अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:38+5:302020-12-23T04:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील मुसळगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कटारा गावात स्वच्छतेचा अभाव आहे. गेल्या १० वर्षांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील मुसळगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कटारा गावात स्वच्छतेचा अभाव आहे. गेल्या १० वर्षांपासून रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येमुळे संतप्त महिलांनी एकत्रित येत पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. गटविकास अधिकारी व उपसभापतींना निवेदन साेपवून समस्या साेडविण्याची मागणी महिलांनी रेटून धरली.
एकीकडे स्वच्छतेसाठी शासन काेट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. शासनातर्फे विविध याेजनांची अंमलबजावणीही केली जात आहे. परंतु कुही तालुक्यातील कटारा गाव मात्र अस्वच्छतेने बरबटलेले आहे. गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण हाेत आहे. गावकऱ्यांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य व स्थानिक लाेकप्रतिधींकडे समस्या मांडली. परंतु आश्वासनाशिवाय त्याचा काहीही फायदा झालेला नाही, अशी महिलांची ओरड आहे. गावातील घाणीच्या समस्येमुळे संतप्त शंभरावर महिलांनी एकत्रित येत साेमवारी पंचायत समिती कार्यालय गाठले. बीडीओ व उपसभापती वामन श्रीरामे यांना निवेदन देऊन महिलांनी गावातील दुर्गंधीपासून सुटका करण्याची मागणी केली. समस्या न सुटल्यास तीव्र आंदाेलनाचा इशारा महिलांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी वीणा ठवकर, कल्याणी कढव, सोनू मेश्राम, रुपाली कातोरे, हर्षलता बांडेबुचे, रंजना अनकर, शालू कढव, कविता गायधने, मोहिनी गायधने, सुनंदा रोडगे, संगीता शेंडे, विद्या डहाके, रंजना शेंडे, विमल कातोरे, सायत्रा शेंडे, ज्योती कातोरे, वर्षा कातोरे, सत्यफुला ठवकर, रेणुका बागडे, गया शेंडे आदींची उपस्थिती हाेती.
...
तालुक्यातील गावांचे आराेग्य अबाधित राहावे, यासाठी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. कटारा गावातील अस्वच्छतेची समस्या तातडीने साेडविली जाईल. गाव स्वच्छ व सुंदर करण्यावर आमचा भर राहील.
- वामन श्रीरामे, उपसभापती, पंचायत समिती, कुही.