श्रेय घेण्याच्या नादात नागरिक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:08 AM2021-05-06T04:08:42+5:302021-05-06T04:08:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लस उपलब्ध नसल्याने मागील तीन-चार दिवसांपासून शहरातील लसीकरण जवळपास ठप्पच आहे. अजूनही पुरेसा ...

Citizens in the mood to take credit | श्रेय घेण्याच्या नादात नागरिक वेठीस

श्रेय घेण्याच्या नादात नागरिक वेठीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लस उपलब्ध नसल्याने मागील तीन-चार दिवसांपासून शहरातील लसीकरण जवळपास ठप्पच आहे. अजूनही पुरेसा साठा आलेला नाही. गुरुवारसाठी ९८४ डोस उपलब्ध आहे; परंतु पदाधिकारी व नगरसेवकांच्या श्रेयवादाच्या चढाओढीत साठा नसतानाही तब्बल ९६ केंद्रावर हे डोस दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे काही केंद्रांना दोन तर काहींना चार डोस उपलब्ध करण्यात आले आहे. लसीकरणाचे श्रेय घेण्याच्या नादात नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार अनाकलनीय आहे.

संक्रमण टाळण्यासाठी गर्दी होणार नाही. यासाठी दक्षता बाळगणे आवश्यक आहे; परंतु मनपा प्रशासन लस उपलब्ध नसताना लसीकरण केंद्र सुरू ठेवून गर्दी जमवणार आहे. केंद्रावर उपलब्ध होणारे दोन-चार डोस कुणाला देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निर्माण होणारा गोंधळ व गर्दीमुळे संक्रमण झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी नगरसेवकांनी वजन वापरून आपल्या प्रभागात लसीकरण केंद्र सुरू केले; परंतु लस तुटवड्यामुळे मागील काही दिवसांंत नागरिकांना केंद्रावर लसीकरणासाठी चकरा माराव्या लागत आहेत. नागरिकांना वस्तुस्थिती न सांगता नगरसेवकांचा केंद्र सुरू ठेवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. गुरुवारी ९६ केंद्रांवर केवळ ९८४ डोस दिले जातील. याचा विचार करता प्रत्येक झोनमध्ये एक केंद्र सुरू ठेवणे अपेक्षित होते; परंतु ९६ केंद्रे सुरू राहणार आहेत. यामुळे काही केंद्रांवर २ तर कुठे ४ डोस उपलब्ध राहणार आहेत. दोन-चार डोससाठी आरोग्य विभागाचे पथक, कर्मचारी ड्युटीवर राहणार असल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

...

झोननिहाय उपलब्ध डोस

लक्ष्मीनगर -११५

धरमपेठ -११७

हनुमाननगर-९७

धंतोली -१४६

नेहरूनगर -५४

गांधीबाग-१०२

सतरंजीपुरा -६२

आसीनगर -७१

मंगळवारी -१०३

एकूण-९८४

....

४५ वर्षांवरील लसीकरण सुरू राहणार

राज्य शासनाचे कोट्यातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे सुविधेकरिता एकूण ९६ केद्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ३ केंद्रांवर कोव्हॅक्सिन, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्र व अ.भा. आर्युविज्ञान संस्थामध्ये ४ येथे कोव्हिशिल्ड याप्रमाणे मनपा व शासकीय मिळून ९६ केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, तर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा येथे कोविशिल्ड लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली. अतिरिक्त ३ केंद्रे सुरू करण्यात आली असून यामध्ये कोव्हॅक्सिन लसीकरण स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रूनगर सेंट्रल एव्हेन्यू व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येईल.

...

नियोजनाचा अभाव, नागरिकांची थट्टा

उपलब्ध लसीचा विचार करून केंद्रे सुरू ठेवणे अपेक्षित होते; परंतु ९८४ डाेस उपलब्ध असताना ९६ केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. काही केंद्रांना २ ते ४ डोस उपलब्ध करण्यात आले. केंद्र सुरू असल्याने नागरिकांची गर्दी होणार व परत जाणार ही नागरिकांची थट्टाच आहे. मनपा प्रशासनात नियोजनाचा अभाव आहे. यातून संक्रमणाचाही धोका आहे.

तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता, मनपा

Web Title: Citizens in the mood to take credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.