विदर्भात नागरिकांनी पाळला जनता कर्फ्यु; सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:44 AM2020-03-22T10:44:59+5:302020-03-22T10:45:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील नागरिकांनी जनता कर्फ्युला पाळल्याचे दृश्य गडचिरोली, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यात दिसले.

Citizens observe Vidarbha curfew; silence everywhere | विदर्भात नागरिकांनी पाळला जनता कर्फ्यु; सर्वत्र शुकशुकाट

विदर्भात नागरिकांनी पाळला जनता कर्फ्यु; सर्वत्र शुकशुकाट

Next
ठळक मुद्देगडचिरोलीसह सर्व जिल्हे कडकडीत बंद

 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील नागरिकांनी जनता कर्फ्युला पाळल्याचे दृश्य गडचिरोली, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यात दिसले.
वर्धा रेल्वेस्थानकावर एरव्ही मोठी गर्दी असते. मात्र रविवारी सकाळी तिथे चिटपाखरूही नव्हते. वंजारी चौक, आरती चौक, बसस्थानकावरही सर्वत्र शांतता होती.
गोंदिया जिल्ह्यातील जनतेने त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे.व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली आहेत.भाजीबाजारासह औषधांचेही दुकाने आज बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाले.गोंदियातील मुख्य बाजारपेठी,जयस्तंभ चौक,फुलचूर नाका,अवंतीबाई चौक, कुडवा नाका परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून मुख्य रस्तावरील वाहतुकही ओसरली आहे. गावखेड्यातही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
एरवी सतत गजबजून राहणा?्या गडचिरोलीमधील इंदिरा गांधी चौकात आज असा शुकशुकाट आहे. एखाद्या दुचाकीचा अपवाद सोडता कोणीही रस्त्याने फिरताना दिसत नाही. गडचिरोली शहरच नाही तर संपूर्ण जिल्हाभरात नागरिकांनी अशा पद्धतीने संपूर्ण व्यवहार अभूतपूर्व बंद ठरवून 'जनता कर्फ्यु'च्या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

यवतमाळ  जिल्ह्यात लाँक डाऊन. रस्ते निर्मनुष्य. जनता कर्फ्यूला प्रतिसाद आहे.  यवतमाळ; वणी; उमरखेड; आर्णी; महागाव; दारव्हासह सर्वच तालुक्यात शुकशुकाट आहे.
भंडारा शहरातही मुख्य बाजारपेठेसह सर्व भागात शांतता होती. कुणीही बाहेर पडत नव्हते. राष्ट्रीय महामार्गावरची वर्दळ पूर्णपणे थांबलेली होती.
चंद्रपुरातील एरव्ही नेहमीच गजबजलेल्या गांधी चौक, गिरनार चौक, जटपुरा गेट, ज्युबिली हायस्कूल चौक, बंगाली कॅम्प चौक, प्रियदर्शिनी चौक आणि वरोरा नाका चौकात शुकशुकाट होता.
अमरावतीच्या राजकमल चौक, इर्विन चौक, राजापेठ, गाडगेनगर , पंचवटी कटोरा नाका आदी भागात नागरिकांनी कडकडीत बंद पाळल्याचे दिसत होते.

 

 

Web Title: Citizens observe Vidarbha curfew; silence everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.