नागरिकांनी लसीचा दुसरा डाेस घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:12+5:302021-05-16T04:08:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी काेविड लसीचा दुसरा डाेस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी काेविड लसीचा दुसरा डाेस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले आहे.
तालुक्यात काेराेनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी लसीचा पहिला डाेस घेतला आहे. प्रथम लसीकरणानंतर दुसरा डाेस घेणे अनिवार्य आहे. दुसरा डोस लसीकरण घेतल्यानंतर किंवा यादरम्यान तालुक्यात कोणत्याही व्यक्तींना काेणतीही दुखापत वा स्वरूपाची हानी झालेली नाही. तसेच लसीचा प्रथम डोस घेतेवेळी झालेल्या किरकोळ अंगदुखी, ताप आदी त्रास दुसरा डोस घेतल्यानंतर जाणवत नाही. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असल्याने ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस न चुकता घ्यावा, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे लसीकरण करावे, असे तहसीलदार सचिन यादव यांनी सांगितले.