नागपूरच्या पार्वतीनगरात कन्टेन्मेंट झोन विरोधात नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 08:37 PM2020-05-26T20:37:35+5:302020-05-26T20:39:28+5:30

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे पांढराबोडी येथील नागरिकांनी विरोध केल्यानंतर मंगळवारी पार्वती नगर व जवाहर नगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले.

Citizens on the street against the containment zone in Parvati Nagar, Nagpur | नागपूरच्या पार्वतीनगरात कन्टेन्मेंट झोन विरोधात नागरिक रस्त्यावर

नागपूरच्या पार्वतीनगरात कन्टेन्मेंट झोन विरोधात नागरिक रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे पांढराबोडी येथील नागरिकांनी विरोध केल्यानंतर मंगळवारी पार्वती नगर व जवाहर नगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले.
प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना नागरिकांना अत्यावश्यक सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही निर्बंधांमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना परिसराच्या बाहेर जाता येत नाही तर परिसराबाहेरील व्यक्तींना आत येता येत नाही यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील खासगी नोकरदारांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्या नोक­ऱ्या जात आहे. मोलमजुरी करणाऱ्या धान्य व बाहेरून जेवणाचा पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत मदत होत नसल्याने नागरिकांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: Citizens on the street against the containment zone in Parvati Nagar, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.