मृतदेहासह वाडोडा येथील नागरिक मनपा कार्यालयावर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:44+5:302021-02-10T04:08:44+5:30
सन १९५८-५९ मध्ये नियोजन प्राधिकरण म्हणून नासुप्रने भांडेवाडी, वाठोडा,तरोडी या भागातील ४५५ एकर जागा सिवरेज प्रकल्पासाठी अधिग्रहीत केली होती. ...
सन १९५८-५९ मध्ये नियोजन प्राधिकरण म्हणून नासुप्रने भांडेवाडी, वाठोडा,तरोडी या भागातील ४५५ एकर जागा सिवरेज प्रकल्पासाठी अधिग्रहीत केली होती. ती त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अॅग्रीकल्चर विभागाला हस्तांतरित केली. नंतर ती महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. यातील भांडेवाडी भागातील जमिनीवर मनपाचे डम्पींगयार्ड आहे.
...
मनपाने आरक्षण बदलले
महापालिकेने ४५० एकर जागेतील डम्पींग यार्डची जागा वगळता अन्य जागेचे आरक्षण बदलले. यातील ७५ एकर जागा सिम्बायसिसला दिली. २०१६ मध्ये १४० एकर जागा साईला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या जागेवर मोठ्या प्रमाणात घरे उभारण्यात आली असल्याने मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी साईला ८७ एकर जागेचा ताबा दिला. ५२ एकर जागेचा ताबा दिला नाही. तसेच साईला उपलब्ध केलेल्या ८७ एकर जागेतील ५८ घरधारकांचे खसरा क्रमांक ५८ मध्ये पुनर्वन करण्याचा निर्णय घेतला होता.
....
नागरिकांकडे रजिस्ट्री
वाडोडा व तरोडी भागात ३०० ते ४०० लोकांची घरे आहेत. अनेकांनी बहुमजली घरांचे बांधकाम केले आहे. त्यांच्याकडे जागेची रजिस्ट्री असून एनएटीपी केले आहे. सातबारावर अनेकांची नावे आहेत. जमिनीच्या मूळ मालकांकडून त्यांनी भूखंड खरेदी केलेले आहे. अशा भूखंडधारकांची संख्या चार ते पाच हजार आहे. यासाठी त्यांनी पैसे मोजले आहे. ही जागा आरक्षित होती तर खरेदी कशी केली. एनएटीपी कसे केले. असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.
....
पटोले यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले
विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी १६ डिसेंबरच्या बैठकीत साईचे बांधकाम थांबवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले होते. वाठोडा व तरोडी भागातील नागरिकांकडे असलेली मालकी हक्काची कागदपत्रे तपासून याबाबतचा अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु एनएमआरडीएने अद्याप अहवाल सादर केला नसल्याची माहिती आहे.