नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:38 PM2019-12-20T23:38:36+5:302019-12-20T23:40:24+5:30

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.

Citizenship amendments; Opposition aggressive on the congratulatory proposal | नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक

नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक

Next
ठळक मुद्देसभागृहात गोंधळ : विरोधकांचा सभात्याग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. या विरोधाला न जुमानता भाजप नगरसेवकांनी हा प्रस्ताव मांडल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच आरोग्य सभापती वीरेंद कुकरेजा यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावर तानाजी वनवे व प्रफुल्ल गुडधे यांनी आक्षेप घेतला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असताना या प्रस्तावावर अभिनंदन प्रस्ताव आणणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. यावर माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी काँग्रेस नगरसेवकांचा आक्षेप तथ्यहीन असल्याची भूमिका घेतली. परंतु विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावरुन सभागृहात गोंधळ वाढला. भाजपचे ज्येष्ठ नगसेवक दयाशंकर तिवारी यांनी सत्तापक्षाच्या प्रस्तावाचे समर्थन करीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अनेक लोक न्यायालयात गेले आहेत. अभिनंदन प्रस्ताव हा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. काश्मीर मधील कलम ३७० हटविल्याने तेथे शांतता आहे. त्यामुळे अभिनंदन प्रस्तावाला विरोध चुकीचा असल्याची भूमिका मांडली. विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. मात्र काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे व हरीश ग्वालबंशी सभागृहात बसून होते. यामुळे सभागृहात उलटसुलट चर्चा होती.

सर्वत्र विरोध अन् अभिनंदन कसले?
कें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात तीव्र आंदोलने होत असताना या निर्णयावर अभिनंदन कसले, असा सवाल विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केला. हा प्रस्ताव सभागृहात मांडण्याची गरज नव्हती, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कायदा केला म्हणून अभिनंदन दुर्दैवी
कें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सभागृहात अभिनंदन प्रस्ताव आणणे दुर्दैवी आहे. या कायद्याला देशभरात नागरिक विरोध करीत आहेत. सभागृहात यापूर्वी एखादा कायदा केला म्हणून अभिनंदन प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे चुकीची परंपरा पाडली जात आहे.
दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Citizenship amendments; Opposition aggressive on the congratulatory proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.