नगर आखाडातर्फे ज्येष्ठ मल्लांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:19 AM2017-09-05T00:19:29+5:302017-09-05T00:19:49+5:30

कुस्तीचा आखाडा गाजविणाºया जुन्या तसेच नामवंत मल्लांच्या कामगिरीचा गौरव म्हणून नगर आखाडा संघटन समितीच्यावतीने राष्टÑीय क्रीडा दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

The City of the akheda by the glory of the senior Malla | नगर आखाडातर्फे ज्येष्ठ मल्लांचा गौरव

नगर आखाडातर्फे ज्येष्ठ मल्लांचा गौरव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुस्तीचा आखाडा गाजविणाºया जुन्या तसेच नामवंत मल्लांच्या कामगिरीचा गौरव म्हणून नगर आखाडा संघटन समितीच्यावतीने राष्टÑीय क्रीडा दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
९६ वर्षांचे बाळकृष्ण आदमने यांच्यासह वयोवृद्ध मल्लांचा शाल, श्रीफळ आणि रोख पुरस्कार देऊन गौरव झाला. माजी आ. यादवराव देवगडे, माजी खा. आणि नगर आखाडा संघटन समितीचे अध्यक्ष गेव्ह आवारी यांनी राष्टÑसंत तुकडोजी महाराज तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
गौरविण्यात आलेल्या मल्लांमध्ये बाळकृष्ण आदमने (रावसाहेब व्यायाम शाळा), गेंदलाल भाटी, सधाकर गुरव, निर्मल जैन, हुकूमत भानारकर, मनोहर खापेकर (सर्व लखमाजी व्यायाम शाळा),पभगवान आकरे, नारायण माने(बजरंग दल व्यायाम शाळा), माजीद खान(बलभीम व्यायाम शाळा), रामा कुंभारे, रामेश्वर टाकळीकर (भीमा महाजन व्यायाम शाळा), नारायण वझलवार(हनुमान व्यायाम शाळा), गिरधर गुमगावकर(नंदगीर व्यायाम शाळा), चिंतामन घोगरे(रामाजी वस्ताद व्यायाम), जियालाल चव्हाण(सार्वजनिक व्यायाम शाळा), संपत हिवसे (हनुमान व्यायाम शाळा), कोलबाजी पहेलवान(गम्या वस्ताद व्यायाम शाळा) आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन ईश्वर झाडे यांनी केले.
कार्यक्रमाला कृष्णराव खापेकर, घनशाम निमवाले, हरिश्चंद्र माकुमे, विजयसिंग वर्मा, अ‍ॅड. राजेश नायक, रामदास देवगडे, रवी डेकाटे, कृष्णानंद पांडे, पवन झाडे, गजेंद्र डफ, चंद्रशेखर तलमले, शुभम डफ, कपिल पाटील, प्रमोद यादव, हरिश्चंद्र हेडावू, दिलीप आदमने, संदीप खरे, मुकुंद मेंढेकर, विश्वनाथ पडोळे, मनोज गायकवाड, शुभम समुंद्रे, रमेश नंदनकर, पांडुरंग मुंढरीकर, श्रावण पराते, अरुण टिकले, उमेश चव्हाण यांची उपस्थिती होती.

Web Title: The City of the akheda by the glory of the senior Malla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.