वाहक न मिळाल्याने नागपूर शहर बसला २.६१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:14 AM2018-04-24T01:14:35+5:302018-04-24T01:14:45+5:30

चालक आहेत मात्र ऐनवेळी वाहक (कंडक्टर) न मिळाल्याने महापालिकेच्या शहर बसच्या सुमारे ४० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गेल्या वर्षभरात महापालिके च्या परिवहन विभागाला २ कोटी ६१ लाखांचा फटका बसला आहे. त्यातच कधी बस कर्मचाऱ्यांचा संप तर कधी आयबीटीएस आॅपरेटर डिम्ट्सची मनमानी यामुळे वाहकचा अभाव बससेवा सुरळीत चालविण्यात बाधा ठरत आहे.

The city bus gets Rs 2.61 crore due to lack of conductor | वाहक न मिळाल्याने नागपूर शहर बसला २.६१ कोटींचा फटका

वाहक न मिळाल्याने नागपूर शहर बसला २.६१ कोटींचा फटका

Next
ठळक मुद्देवर्षभरात ४० हजार फेऱ्या बाधित : प्रावाशांचीही झाली गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चालक आहेत मात्र ऐनवेळी वाहक (कंडक्टर) न मिळाल्याने महापालिकेच्या शहर बसच्या सुमारे ४० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गेल्या वर्षभरात महापालिके च्या परिवहन विभागाला २ कोटी ६१ लाखांचा फटका बसला आहे. त्यातच कधी बस कर्मचाऱ्यांचा संप तर कधी आयबीटीएस आॅपरेटर डिम्ट्सची मनमानी यामुळे वाहकचा अभाव बससेवा सुरळीत चालविण्यात बाधा ठरत आहे.
शहरात सध्या ३७५ बसेस धावत असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु प्रत्यक्षात उभ्या असलेल्या बसेस चालविण्यासाठी वाहक उपलब्ध न केल्याने रविवारी बसेसच्या ५० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सोमवारीसुद्धा २५ ते ३० फेऱ्या होऊ शकल्या नाही.
बसेस न धावल्याने तिकिटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होतो. शहरात तीन रेड बस आॅपरेटर व एक ग्रीन बस आॅपरेटर आहे. सध्या २५ ग्रीन बसेस धावत आहेत. शहर बससेवेतील रेड बसेसमधून दररोज १.७५ ते १.८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. प्रति किलोमीटरच्या आधारावर बस आॅपरेटरला महापालिके ला आर्थिक मोबदला द्यावा लागतो. मात्र तिकिटाची रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा केली जाते. बस वाहकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी डिम्ट्स कंपनीवर आहे. एसआयएस व युनिटी कंपनीमार्फ त वाहकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहर बससेवेत १८०० वाहक आहेत. त्यांची डिम्टस्च्या माध्यमातून विविध मार्गावर नियुक्ती के ली जाते. वाहकांनी तिकिटांच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम महापालिके च्या खात्यात जमा केली जाते. विना वाहक बसेस धावल्या तर ही रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा होत नाही.
परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनीही वाहक उपलब्ध होत नसल्याला दुजोरा दिला. यासंदर्भात डिम्ट्सला नोटीस बजावून खुलासा मागविला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले.
कधी संप तर कधी मनमानी
कधी संप तर कधी डिम्ट्स कंपनीमुळे शहर बसला वाहक उपलब्ध झाले नाही. यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी खाली उतरतात. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. मार्च २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत आर.के.सिटी बस सर्व्हिसेसला वाहक न मिळाल्याने १६५३२७ कि.मी.चे संचालन प्रभावित झाले. यामुळे ८२.६६ लाखांचे नुकसान झाले. हंसा सिटी बस सर्व्हिसेस यांना वाहक न मिळाल्याने १८६२०६ कि. मी.चे संचालन करता आले नाही. यामुळे ८८.३३ लाखांचे तर ट्रॅव्हल टाईमला ९०.५६ लाखांचे नुकसान झाले.

Web Title: The city bus gets Rs 2.61 crore due to lack of conductor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.